जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / HBD Murali Vijay : मित्राच्या बायकोशी केलं लग्न, क्रिकेट विश्वात सर्वात वादग्रस्त आहे विजयची Love Story

HBD Murali Vijay : मित्राच्या बायकोशी केलं लग्न, क्रिकेट विश्वात सर्वात वादग्रस्त आहे विजयची Love Story

HBD Murali Vijay : मित्राच्या बायकोशी केलं लग्न, क्रिकेट विश्वात सर्वात वादग्रस्त आहे विजयची Love Story

टीम इंडियाचा क्रिकेटपटू मुरली विजयची (Murali Vijay) लव्हस्टोरी ही चांगलीच वादग्रस्त आहे. कदाचित क्रिकेट विश्वात कुणाचीही विजयसारखी लव्हस्टोरी नसेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 एप्रिल : प्रेमाचे धागे कधी कोणत्या व्यक्तीशी जुळतील हे सांगता येत नाही. प्रेम हे कोणत्याही वयात आणि कोणत्याही व्यक्तीवर होऊ शकतं. अनेकदा प्रेमात पडलेल्या व्यक्तींना जगाची पर्वा नसते. टीम इंडियाचा क्रिकेटपटू मुरली विजयचा (Murali Vijay) आज (1 एप्रिल) वाढदिवस आहे. 61 टेस्ट, 17 वन-डे आणि 9 टी20 इंटरनॅशनलमध्ये विजयनं भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं. विजयची लव्हस्टोरी ही चांगलीच वादग्रस्त आहे. कदाचित क्रिकेट विश्वात कुणाचीही विजयसारखी लव्हस्टोरी नसेल. कार्तिकच्या बायकोवर जडला जीव विजयचा टीम इंडिया आणि तामिळनाडू टीममधील सहकारी दिनेश कार्तिकची पहिली बायको निकिताबरोबर विजयचं प्रेम जुळलं. कार्तिक आणि निकिता यांचं 2007 साली लग्न झालं होतं. 2012 साली आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान विजय आणि निकिता यांची भेट झाली. त्यानंतर हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. कार्तिकला त्यांच्या प्रेमाबद्दल कळल्यानंतर त्याने निकिताशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कार्तिक आणि निकिता यांचा घटस्फोट झाला तेव्ही ती गर्भवती होती. कार्तिकशी घटस्फोट झाल्यानंतर निकिता आणि विजय यांनी लग्न केलं. निकिताला नंतर मुलगा झाला. कार्तिकनं कधीही त्या मुलावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला नाही. कार्तिकच्या आयुष्यात त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्कॉश खेळाडू दीपिका पल्लिकलची एन्ट्री झाली. कार्तिक आणि दीपिका यांचं 2015 साली लग्न झालं. त्यांना जुळी मुलं आहेत. मुरली विजयची क्रिकेट कारकिर्द मुरली विजय टेस्ट क्रिकेटमधील यशस्वी ओपनर आहे. विजयनं 2008 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 61 टेस्टमध्ये 38.29 च्या सरासरीनं 3982 रन केले असून यामध्ये 12 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2022 : 15 सिझनमध्ये CSK वर पहिल्यांदाच ओढावली नामुश्की, जडेजानं सांगितलं पराभवाचं कारण चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल विजेत्या टीमचाही तो सदस्य होता. विजयनं आयपीएल कारकिर्दीमध्ये 106 मॅचमध्ये 121.87 च्या स्ट्राईक रेटनं 2619 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 13 अर्धशतक त्यानं झळकावली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात