मुंबई, 11 मार्च : आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन 26 मार्चपासून सुरू होत आहे. या सिझनसाठी सर्वच टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आगामी सिझनसाठी फास्ट बॉलिंग कोच म्हणून श्रीलंकेचा दिग्गज बॉलर लसिथ मलिंगाची (Lasith Malinga) नियुक्ती केली आहे. श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकारा या टीमचा हेड कोच आहे, त्यानंतर आणखी एका श्रीलंकन दिग्गजाची राजस्थानच्या कोचिंग स्टाफमध्ये एन्ट्री झाली आहे. आयपीएलचा सर्वात यशस्वी बॉलर मलिंगा आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून एका दशकापेक्षा जास्त काळ खेळला आहे. तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी बॉलर आहे. मलिंगाने 122 आयपीएल मॅचमध्ये 7.19 च्या सरासरीनं 170 विकेट्स घेतल्या आहेत. एका आयपीएल मॅचमध्ये 4 विकेट्स घेण्याची कामगिरी 6 वेळा तर 5 विकेट्स घेण्याची कामगिरी त्यानं 1 वेळा केली आहे. मुंबई इंडियन्सच्या आयपीएल विजेतेपदामध्ये मलिंगाच्या भेदक बॉलिंगचा मोठा वाटा आहे.
*𝐤𝐢𝐬𝐬𝐞𝐬 𝐭𝐡𝐞 𝐛𝐚𝐥𝐥*
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 11, 2022
Lasith Malinga. IPL. Pink. 💗#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/p6lS3PtlI3
लसिथ मलिंगा वनडे आणि टी-20 क्रिकेटमधला सगळ्यात धोकादायक बॉलरपैकी एक होता. मलिंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेने 2014 टी-20 वर्ल्ड कप जिंकला. मलिंगाने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये (फर्स्ट क्लास, लिस्ट ए, टी20) एकूण 1093 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगाच्या नावावर टेस्टमध्ये 101, वनडेमध्ये 338 आणि टी-20 मध्ये 107 विकेट घेतल्या. मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 वेळा हॅट्रिक घेतली आहे. तसंच लागोपाठ 4 बॉलला 4 विकेट घेण्याचा विक्रम मलिंगाने दोनवेळा केला आहे. मलिंगा टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 विकेट घेणारा पहिलाच बॉलर आहे. तसंच वनडे क्रिकेटमध्ये तीन हॅट्रिक घेणारा मलिंगा एकमेव बॉलर आहे. Women’s World Cup : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज लढत कधी आणि कुठे पाहाल Live? मलिंगाच्या या मोठ्या अनुभवाचा राजस्थान रॉयल्सला फायदा होणार आहे. या टीममध्ये आगामी सिझनसाठी ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, नॅथन कुल्टर नाईल, नवदीप सैनी हे प्रमुख फास्ट बॉलर आहेत. संजू सॅमसन राजस्थानचा कॅप्टन आहे. राजस्थानची आयपीएल स्पर्धेतील पहिली मॅच सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध 29 मार्च रोजी होणार आहे. राजस्थान रॉयल्सची संपूर्ण टीम : देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन) जॉस बटलर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, नवदीप सैनी, तेजस बरोका, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, शुभम गरव्हाल, नॅथन कुल्टर नाईल, रस्सी व्हॅन डर डुसेन, जेम्स नीशम, डॅरेल मिचेल, करुण नायर, ओबेड मॅककॉय

)







