जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : सुपर संडेला 'कुलचा' चा धमाका, वर्ल्ड कप खेळणारा बॉलर पडला मागं

IPL 2022 : सुपर संडेला 'कुलचा' चा धमाका, वर्ल्ड कप खेळणारा बॉलर पडला मागं

IPL 2022 : सुपर संडेला 'कुलचा' चा धमाका, वर्ल्ड कप खेळणारा बॉलर पडला मागं

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ही स्पिन बॉलर्सची जोडी कुलचा नावानं प्रसिद्ध आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी न देणे ही निवड समितीची चूक होती, हे त्यांनी या आयपीएलमध्ये दाखवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2002 मध्ये रविवारी दोन सामने (डबल हेडर) झाले. पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात झाला. तर दुसरा राजस्थान रॉयल्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG) हा होता. या दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियात ‘कुलचा’ नावानं प्रसिद्ध असलेल्या जोडीनं कमाल केली आहे. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ही स्पिन बॉलर्सची जोडी कुलचा नावानं प्रसिद्ध आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी न देणे ही निवड समितीची चूक होती, हे त्यांनी या आयपीएलमध्ये दाखवलं आहे. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये कुलदीप आणि चहल यांच्याकडे दुर्लक्ष करत निवड समितीनं  वरूण चक्रवर्तीला प्राधान्य दिलं होतं. या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत युजवेंद्र चहलनं सर्वात जास्त 11 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुलदीप यादव 10 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर केकेआरकडून खेळणाऱ्या वरूण चक्रवर्तीनं 5 मॅचनंतर फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत. केकेआरविरूद्ध झालेल्या मॅचमध्ये  कुलदीप यादव  दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कुलदीपने 4 ओव्हरमध्ये 35 रन देत 4 विकेट घेतल्या, त्याने श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, सुनिल नारायण आणि उमेश यादवची विकेट घेतली. आयपीएलच्या मागच्या मोसमापर्यंत कुलदीप यादव केकेआरच्या टीममध्ये होता, पण त्याला इयन मॉर्गनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या कोलकात्याने मैदानातच उतरवलं नाही. केकेआरच्या या निर्णयाबाबत कुलदीपने अनेकवेळा उघडपणे नाराजीही व्यक्त केली होती. आयपीएल लिलावाआधी केकेआरने कुलदीप यादवला रिलीज केलं. लिलावामध्ये दिल्लीने कुलदीपला 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. IPL 2022 : राहुलच्या विकेटनं जागवल्या भारत-पाकिस्तान मॅचच्या आठवणी, पाहा VIDEO युजवेंद्र चहलनं लखनऊ विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 41 रन देत 4 विकेट्स घेतल्या. चहलच्या भेदक स्पेलमुळेच राजस्थाननं ही मॅच 3 रननं जिंकली. या कामगिरीसाठी चहलचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात