मुंबई, 1 डिसेंबर : आयपीएल 2022 चे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आगामी मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) आठ टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) 4 खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये 2 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएल 2022 साठी केकेआरने आंद्रे रसेल (Andre Russell), व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer), वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि सुनिल नारायण (Sunil Narine) यांना रिटेन केलं आहे.
केकेआरनं 33 वर्षांचा सुनील नरीन (Sunil Narine) आणि त्याच्याच वयाचा वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) यांना रिटेन केलं आहे. हे दोघंही केकेआरचे जुने खेळाडू आहेत. या खेळाडूंना रिटेन करण्याच्या निर्णयाचा केकेआरला आगामी सिझनमध्ये फटका बस शकतो.
आंद्रे रसेलला मागील आयपीएल सिझनमध्ये दुखापतीमुळे आयपीएल फायनल (IPL 2021 Final) खेळता आली नव्हती. याचा फटका केकेआरला बॅटींग आणि बॉलिंग दोन्हीमध्ये बसला. चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) पहिल्यांदा बॅटींग करत 3 आऊट 192 रन केले. त्याला उत्तर देताना केकेआरला 165 रनच करता आले. त्यामुळे चेन्नईनं 27 रननं फायनलमध्ये केकेआरला पराभूत करत आयपीएल विजेतेपद पटकावले.
रसेल आयपीएल 2021 मधील सेकंड हाफमध्ये 10 पैकी फक्त 3 मॅच खेळू शकला. त्यानं या सिझनमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावले. दुखापतीचा फटका त्याच्या बॉलिंगवरही झाला. त्यानं संपूर्ण सिझनमध्ये फक्त 19 ओव्हर्स बॉलिंग केली आणि 9.89 च्या इकोनॉमी रेटनं 188 रन दिले. केकेआरच्या टीममध्ये रसेलवर फिनिशरची जबाबदारी आहे. पण, त्याला ती जबाबदारी पूर्ण करता आली नाही. या सर्व अपयशानंतही केकेआरनं रसेलसाठी 12 कोटी मोजले आहेत.
IPL 2022: पंजाब किंग्ज सोडताच KL Rahul ची पहिली प्रतिक्रिया, तो प्रवास...
सुनील नरीनला केकेआरनं 6 कोटी रूपये देऊन खरेदी केले. त्याला यापूर्वी 12.5 कोटी रुपये मिळत होते. नरीनचं यंदा साडेसहा कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. असं असलं तरी नरीनच्या खेळातही यापूर्वीचे सातत्य राहिलेले नाही. आयपीएल फायनलमध्ये तो चेन्नईच्या टीमला रोखण्यात अपयशी ठरला. त्याचबरोबर त्यानं 14 मॅचमध्ये फक्त 62 रन केले आहेत. नरीनसारख्या टी20 स्पेशालिस्ट खेळाडूकडून केकेआरला यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.