Home /News /sport /

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला निर्णायक टप्प्यात धक्का, मॅच विनर टीममधून आऊट

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला निर्णायक टप्प्यात धक्का, मॅच विनर टीममधून आऊट

दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेतील निर्णायक टप्प्यात दिल्लीला मोठा धक्का बसला आहे.

    मुंबई, 13 मे : दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचे 12 मॅचनंतर 12 पॉईंट्स असून 'प्ले ऑफ' मध्ये जाण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. आयपीएल स्पर्धेतील निर्णायक टप्प्यात दिल्लीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मॅच विनर ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) उर्वरित 2 सामने खेळणार नाही. पृथ्वी शॉला टायफाईड झाला आहे. त्यामुळे तो दिल्लीच्या गेल्या तीन मॅचमध्ये खेळलेला नाही. तो शेवटच्या दोन सामन्यातही खेळणार नसल्याची माहिती टीमचा असिस्टंट कोच शेन वॉटसन यानं दिली आहे. 'त्याच्या तपासात काय आढळलं आहे हे मला माहिती नाही. पण त्याला गेल्या 2 आठवड्यापासून ताप होता. तो न खेळल्यानं आम्हाला फटका बसणार आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा अशी मी प्रार्थना करतो, पण दुर्दैवानं शेवटच्या 2 मॅचसाठी तो फिट होणार नाही,' असे वॉटसनने 'द ग्रेड क्रिकेटर' शी बोलताना सांगितले. दिल्लीची पुढील लढत 16 मे रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध तर शेवटची लढत 21 मे रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध होणार आहे. पंतही भावुक पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीमुळे दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतही (Rishabh Pant) भावुक झाला आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध विजय मिळवल्यानंतर त्यानं ही भावना बोलून दाखवली.  'आम्हाला त्याची मोठी कमतरता जाणवत आहे. पण, या गोष्टी नियंत्रणात नाहीत. त्याला टायफाईड की असंच काही तरी झालं आहे, असं डॉक्टरनं मला सांगितलं. तो लवकर परत येईल अशी आशा आहे. पण, तो कधी येणार हे माहिती नाही,' असं पंत म्हणाला होता. IPL 2022 : मुंबईच्या 19 वर्षांच्या खेळाडूची कमाल, पंतचा 5 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला पृथ्वी शॉने या सिझनमधील 9 सामन्यांमध्ये 159.88 च्या स्ट्राईक रेटनं 259 रन केले आहेत. त्यानं डेव्हिड वॉर्नरच्या जोडीनं दिल्लीला दमदार सुरूवात करून दिली होती. त्याच्या अनुपस्थितीमध्ये दिल्लीनं मनदीप सिंह आणि केएस भरत यांचा प्रयोग केला. पण, हे दोन्ही प्रयोग फसले. भरत राजस्थान विरूद्ध शून्यावरच आऊट झाला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022

    पुढील बातम्या