Home /News /sport /

IPL 2022: आयपीएल टीमचा पुढचा प्लॅन तयार, यंगिस्तानवर देणार सर्वाधिक भर

IPL 2022: आयपीएल टीमचा पुढचा प्लॅन तयार, यंगिस्तानवर देणार सर्वाधिक भर

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी सर्व टीममध्ये मोठे बदल होणार आहेत. या बदलात यंगिस्तानवर भर देण्याची आयपीएल टीमची योजना आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी सर्व टीममध्ये मोठे बदल होणार आहेत. या सिझनपूर्वी खेळाडूंचं मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होईल. या लिलावापूर्वी काही खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आयपीएल टीमना देण्यात येणार आहे. एका रिपोर्टनुसार सध्याच्या टीमना 4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी असेल. तर दोन नव्या टीमला 3 खेळाडू निवडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. विराट कोहली (RCB), रोहित शर्मा (Mumbai Indians) आणि महेंद्रसिंह धोनी (CSK) हे दिग्गज खेळाडू त्यांच्या टीमसोबत राहणार हे नक्की आहे. त्याचबरोबर आयपीएल टीम आता यंगिस्तानवरही भर देण्याचा विचार करत आहेत. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' मधील वृत्तानुसार इशान किशन, ऋतुराद गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांना त्यांची टीम रिटेन करणार आहे. इशान किशन मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे. ऋतुराज चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. तर पृथ्वी शॉ 2018 पासून दिल्ली कॅपिटल्सकडं आहे. या तिघांमध्ये ऋतुराज गायकवाड मागील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) सर्वाधिक फॉर्मात होता. त्यानं 635 रन करत ऑरेंज कॅप पटकावली. तर इशान किशननं मागील सिझनमध्ये फक्त 241 रन काढले. त्याला काही मॅचमध्ये प्लेईंग 11 मधूनही वगळण्यात आले होते. पृथ्वी शॉ ने 159.13 च्या स्ट्राईक रेटनं 479 रन काढले होते. IPL 2022: Mega Auction आणि नव्या टीमसाठी BCCI चे काय आहेत नियम? वाचा सविस्तर मुंबई इंडियन्सच्या इशान किशनचा पगार 6.2 कोटी रूपये आहे. तर ऋतुराज गायकवाडला चेन्नईनं 20 लाखांमध्ये खरेदी केले होते. त्यांना कायम ठेवल्यानं या टीमचा बराच पैसा वाचणार आहे. दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉला 1.2 कोटींंमध्ये खरेदी केले होते. या तीन खेळाडूंच्या शिवाय ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंना देखील त्यांची टीम रिटेन करणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या