मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: Mega Auction आणि नव्या टीमसाठी BCCI चे काय आहेत नियम? वाचा सविस्तर

IPL 2022: Mega Auction आणि नव्या टीमसाठी BCCI चे काय आहेत नियम? वाचा सविस्तर

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सिझनपूर्वी (Indian Premier League 2022) खेळाडूंचं मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. या सिझनसाठी बीसीसीआयची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सिझनपूर्वी (Indian Premier League 2022) खेळाडूंचं मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. या सिझनसाठी बीसीसीआयची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सिझनपूर्वी (Indian Premier League 2022) खेळाडूंचं मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. या सिझनसाठी बीसीसीआयची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 ऑक्टोबर:  इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सिझनपूर्वी (Indian Premier League 2022) खेळाडूंचं मेगा ऑक्शन (Mega Auction) होणार आहे. पुढील लीगमध्ये अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. त्यामुळे एकूण 10 टीममध्ये खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चुरस होणार आहे. कोणता खेळाडू कोणत्या टीमचा सदस्य होईल? कोणत्या खेळाडूला त्याची टीम रिटेन करेल याची आता सर्वांना उत्सुकता आहे. पुढील वर्षीच्या आयपीएल लिलावाबाबत बीसीसीआयची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यानं 'इनसाईड स्पोर्ट्स' या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल सिझनसाठी जानेवारी महिन्यात लिलाव होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील सध्या अस्तित्वात असलेल्या आठ फ्रँचायझींना डिसेंबर महिन्यापर्यंत रिटेन खेळाडूंची यादी सादर करण्याची मुदत देण्यात येणार आहे.

गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'येत्या सात-आठ दिवसांमध्ये पुढील आयपीएल सिझनसंबंधीच्या सर्व टेटलाईन जारी करण्यात येतील. आम्ही सर्व फ्रँचायझींशी याबाबत अनौपचारिक चर्चा केली आहे. खेळाडूंना रिटेन करण्याची डेडलाईन, ऑक्शन पर्स, लिलावाची तारीख पुढील काही दिवसांमध्ये निश्चित होईल आणि त्याबाबत फ्रँचायझींना कळवले जाईल.

IPL 2022: मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला वगळणार! 'या' 3 खेळाडूंना देणार पसंती

नव्या टीमना  सवलत

बीसीसीआय 2 नव्या फ्रँचायझींना आयपीएल ऑक्शनपूर्वी प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्याच्या विचारात आहे. ' नव्या टीमला त्यांचा कोर तयार करण्याची संधी दिली पाहिजे. ही संधी उपलब्ध व्हावी म्हणून मार्ग काढणे आवश्यक आहे. ज्यामध्ये खेळाडूंची फिस तसंच विशेष खेळाडूंना ऑक्शनपूर्वी निवडण्याची संधी याचा समावेश असेल. जुन्या टीमकडं खेळाडूंना रिटेन करण्याचा पर्याय असेल. त्यामुळे नव्या टीमला ही संधी देण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सला बसणार मोठा धक्का, बडा खेळाडू सोडणार साथ

नव्या टीमला तीन खेळाडूंना निवडण्याचं स्वातंत्र्य देण्याबाबत दोन फ्रँचायझी खूश नाही, असं वृत्तही इनसाईड स्पोर्ट्सनं दिलं आहे. 'बीसीसीआयनं आरटीएमबाबत आम्हाला स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत आम्ही तीन खेळाडूंना निवडण्याचा प्रस्ताव मान्य करणार नाहीत.' असं या फ्रँचायझींनी कळवले आहे.

First published:

Tags: BCCI, Ipl 2022, Ipl 2022 auction