आदितीसोबत वानखेडेवर दिसलेल्या तिच्या मैत्रिणीचे नाव काशिका कपूर (Kashika Kapoor) आहे. काशिका देखील मॉडेल असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.8 दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.IPL cameraman >>>> IPL pic.twitter.com/101abL1kNU
— Ash (@anguuu20) May 21, 2022
इशान किशननं दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या मॅचमध्ये मुंबईकडून सर्वात जास्त 48 रन केले. इशान किशनची या आयपीएल ऑक्शनमध्ये सर्वाधिक 15 कोटी 25 लाख रूपये देऊन मुंबई इंडियन्सनं खरेदी केली. त्यानं या आयपीएल सिझनमधील 14 सामन्यात 32.15 च्या सरासरीनं 418 रन केले. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2022 : उमरान मलिकच्या खतरनाक बाऊन्सरपुढे मयंक निरूत्तर, पाहा VIDEO इशानच्या मुंबई इंडियन्ससाठी ही आयपीएल स्पर्धा निराशानजन ठरली. मुंबईला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये त्यांनी दहावा क्रमांक पटकावला. आयपीएलनंतर होणाऱ्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेसाठी इशानची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी ही मालिका इशानसाठी महत्त्वाची आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ishan kishan, Mumbai Indians