जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / '...तर मला 15 कोटी सहज मिळाले असते', IPL स्पर्धेच्या दरम्यान शास्त्रींचा मोठा दावा!

'...तर मला 15 कोटी सहज मिळाले असते', IPL स्पर्धेच्या दरम्यान शास्त्रींचा मोठा दावा!

'...तर मला 15 कोटी सहज मिळाले असते', IPL स्पर्धेच्या दरम्यान शास्त्रींचा मोठा दावा!

रवी शास्त्री (Ravi Shastri) हे नेहमीच त्याच्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ‘तुम्ही आयपीएल ऑक्शनमध्ये असता? तर किती रक्कम मिळाली असती?’ असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च : टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परतले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते कॉमेंटेटर होते. 2016 साली टीम इंडियाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर त्यांनी कॉमेंट्री करणे सोडले होते. शास्त्री हे नेहमीच त्याच्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. ‘तुम्ही आयपीएल ऑक्शनमध्ये असता? तर किती रक्कम मिळाली असती?’ असा प्रश्न शास्त्री यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी त्याचं रोखठोक उत्तर दिलं आहे. ‘इसपीएन क्रिकइन्फो’वरील कार्यक्रमात बोलताना शास्त्री यांनी आपल्याला आरामात 15 कोटी मिळाले असते, तसंच मी आयपीएल टीमचा कॅप्टन झालो असतो यामध्ये कोणतीही शंका नाही, असा दावा केला आहे. शास्त्री यांनी दावा केलेली रक्कम सध्याच्या सिझनमध्ये महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) मिळणाऱ्या रकमेपेक्षा जास्त आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) माजी कॅप्टन असलेल्या धोनीला यंदा 12 कोटी रूपये देऊन सीएसकेनं रिटेन केले आहे. टीम इंडियानं 1983 साली जिंकलेल्या वर्ल्ड कप टीमचे शास्त्री सदस्य होते.  डाव्या हातानं ऑफ स्पिन बॉलिंग आणि उजव्या हाताने बॅटींग करणाऱ्या शास्त्री यांनी 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये टीम इंडियासाठी अनेक उपयुक्त खेळी केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 1985 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांना ‘प्लेयर ऑफ दी सीरिज’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. या पुरस्कार विजेत्यासाठी असलेली ऑडी कार शास्त्री यांना भेट देण्यात आली होती. IPL 2022 : राजस्थानच्या विजयात चहल चमकला, T20 मध्ये ‘हा’ रेकॉर्ड करणारा चौथा भारतीय बनला मागच्या वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा हेड कोच म्हणून कालावधी समाप्त झाला. शास्त्री यांच्या कालावधीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात दोन वेळा टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला. तसंच इंग्लंडमधील टेस्ट सीरिजमध्येही आघाडी घेतली. एकाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यात त्यांना अपयश आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात