मुंबई, 30 मार्च : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आयपीएल स्पर्धेची (IPL 2022) सुरूवात विजयानं केली आहे. राजस्थानच्या या विजयात लेग स्पिनर युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) महत्त्वाचा वाटा होता. चहल गेल्या सिझनपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) टीमचा सदस्य होता. राजस्थान रॉयल्सकडून पहिल्याच मॅचमध्ये त्याने चार ओव्हर्समध्ये 22 रन देत 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्यानं टी20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्सचा टप्पाही पूर्ण केला आहे. चहलनं हैदराबाद विरूद्ध अभिषेक शर्मा, अब्दुल समद आणि रोमारियो शेफर्ड यांना आऊट करत हा रेकॉर्ड पूर्ण केला. टी20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेणारा तो चौथा भारतीय आहे. यापूर्वी पियूष चावला, आर. अश्विन आणि अमित मिश्रा यांनी ही कामगिरी केली आहे. चहलनं टीम इंडिया, हरयाणा, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हा रेकॉर्ड केला आहे. रोमारियो शेफर्डला आऊट करत त्यानं टी20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण केले. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडिज आणि चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी बॉलर ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्याने 574 विकेट्स घेतल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इम्रान ताहीर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताकडून सर्वात जास्त विकेट्स पियूष चावलाच्या नावावर आहेत. चावलानं टी20 मध्ये 270 विकेट्स घेतल्या आहेत. IPL 2022 : राजस्थान रॉयल्सला मिळाला वादग्रस्त निर्णयाचा फायदा! SRH चे फॅन्स संतापले राजस्थान ऑन टॉप राजस्थान रॉयल्सनं मोठ्या विजयामुळे पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. राजस्थान 3.050 च्या रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहेत. दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि गुजरातपेक्षा राजस्थानचा रनरेट जास्त आहे. दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचा रनरेट 0.914 आहे. दिल्लीने मुंबईला पराभूत केलं होतं. त्यानंतर पंजाब किंग्स तिसऱ्या नंबरवर आहे. त्यांनी आरसीबी विरुद्ध 206 धावांचे मोठे लक्ष्य पार केले होते. 0.697 त्यांचा नेट रनरेट आहे. त्यानंतर कोलकाता चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.