मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 6 पराभवानंतरही आहे CSK ला 'प्ले ऑफ' ची संधी, वाचा काय आहे समीकरण

IPL 2022 : 6 पराभवानंतरही आहे CSK ला 'प्ले ऑफ' ची संधी, वाचा काय आहे समीकरण

फोटो - IPL

फोटो - IPL

IPL 2022 Playoffs: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील 'प्ले ऑफ' ची शर्यत आता चुरशीची होऊ लागली आहे. यंदा 10 टीम खेळत असून त्यापैकी 4 टीम 'प्ले ऑफ' मध्ये जातील.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 2 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील 'प्ले ऑफ' ची शर्यत आता चुरशीची होऊ लागली आहे. यंदा 10 टीम खेळत असून त्यापैकी 4 टीम 'प्ले ऑफ' मध्ये जातील. आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही एकमेव टीम या शर्यतीमधून बाहेर पडली आहे. आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची यशस्वी टीम असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) या सिझनमधील आत्तापर्यंतची कामगिरी खराब झाली आहे.

सीएसकेनं आठपैकी सहा सामने गमावल्यानंतर रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) कॅप्टनपदाचा राजीनामा दिला. त्याच्या जागी पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) नियुक्ती झाली आहे. धोनीनं पुन्हा कॅप्टन झाल्यानंतर पहिल्याच मॅचमध्ये टीमला विजय मिळवून दिला. सीएसकेनं रविवारी सनरायझर्स हैदराबादचा 13 रननं पराभव केला. सीएसके या सिझनमधील हा तिसरा विजय आहे. या विजयानंतर त्यांच्या 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत.

सीएसकेचे आणखी पाच सामने बाकी आहेत. त्यांनी हे सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण 16 पॉईंट्स होतील आणि प्ले ऑफ गाठण्याची आशा कायम राहील. अर्थात त्यासाठी त्यांना अन्य निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे, पण ही टीम आता सर्व समीकरण बिघडवू शकते. मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातही एक सामना होणार असून त्यामध्ये चेन्नईला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवावा लागेल.

IPL 2022, KKR vs RR Dream 11 Team Prediction: 'हे' खेळाडू करतील तुम्हाला मालामाल

सीएसकेच्या आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स विरूद्ध सामने बाकी आहेत. त्यामुळे त्यांचा 'प्ले ऑफ' गाठण्याचा मार्ग सोपा नाही. तरीही कॅप्टन महेंद्रसिंह धोनी काही तरी चमत्कार करेल, अशी आशा त्यांच्या फॅन्सना आहे.

First published:

Tags: Cricket, Csk, Ipl 2022, MS Dhoni