मुंबई, 4 मे : आयपीएल 2022 मध्ये जोरदार फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) पंजाब किंग्जनं (Punjab Kings) 8 विकेट्सनं पराभव केला. गुजरातनं पहिल्यांदा बॅटींग करताना 8 आऊट 143 रन केले. पंजाबनं 144 रनचं आव्हान 16 ओव्हर्समध्ये आणि 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिकच्या या निर्णयाचा टीमला फटका बसला. त्यांच्या विकेट्सही नियमित अंतरानं पडल्या. त्यामुळे गुजरातला 150 चा टप्पाही पार करता आला नाही. या आयपीएल सिझनमधील नाईट मॅचमध्ये कोणत्याही टीमनं टॉस जिंकल्यानंतर बॅटींग केली नव्हती. दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडत असल्यानं बॉलिंग करणे सोपे नसते, हे याचं मुख्य कारण आहे. हार्दिकनं पहिल्यांदाच हा ट्रेंड तोडला. हार्दिकच्या या निर्णयाचा गुजरातला फटका बसला. त्यांनी या सिझनमध्ये सर्वात कमी स्कोअर केला. हार्दिकनं केला बचाव हार्दिक पांड्यानं मॅचनंतर बोलताना या निर्णयाचा बचाव केला. ‘पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय चुकीचा नव्हता. आम्हाला कम्फर्ट झोनच्या (टार्गेटचा पाठलाग करणे) बाहेर जाण्याची गरज होती. आम्ही या स्पर्धेत टार्गेटचा चांगल्या पद्धतीनं पाठलाग केला आहे. गरज पडली तर (स्पर्धेच्या नंतरच्या टप्प्यात) आम्हाला टार्गेट निश्चित कसं करायतं हे माहिती व्हायला हवं,’ असं हार्दिकनं सांगितलं. हा शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. आम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर आल्यावर कसं खेळायचं हे शिकावं लागेल. आम्ही जिंकत होतो, तेव्हाही आम्ही नेहमीच आणखी चांगलं कसं होता येईल यावरच चर्चा करत होतो. आजही आमच्या मनासारख्या न घडलेल्या गोष्टींवर चर्चा करू. पुढच्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीनं कमबॅक करू. विजय आणि पराभव हे खेळाचा भाग आहेत.’ असे हार्दिकने स्पष्ट केले. IPL 2022 : प्ले-ऑफची रेस आणखी रोमांचक, Mumbai Indians खराब करणार या टीमचा खेळ! पंजाब किंग्सविरुद्ध पराभव झाला असला तरी गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर कायम आहे. गुजरातने 10 पैकी 8 मॅच जिंकल्या असून 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे पंजाबची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. पंजाबने 10 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.