जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : गुजरातच्या टीममध्ये नवा खेळाडू दाखल, हार्दिकचा होणार डबल फायदा

IPL 2022 : गुजरातच्या टीममध्ये नवा खेळाडू दाखल, हार्दिकचा होणार डबल फायदा

IPL 2022 : गुजरातच्या टीममध्ये नवा खेळाडू दाखल, हार्दिकचा होणार डबल फायदा

आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्समध्ये (Gujrat Titans) एक बदल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मार्च : आयपीएल 2022 ला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्समध्ये (Gujrat Titans) एक बदल झाला आहे. गुजरातचा आक्रमक ओपनर जेसन रॉयनं (Jason Roy) बायो-बबलमधील थकव्याचं कारण देत या सिझनमधून माघार घेतली आहे. रॉयच्या जागी  अफगाणिस्तानचा विकेट किपर-बॅटर रहमामुल्लाह गुरबाजचा ( Rahmanullah Gurbaz) बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच आयपीएल सिझन आहे.  त्यांची स्पर्धेतील पहिली मॅच 28 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरूद्ध होणार आहे. गुरबाजच्या टीममधील समावेशानं गुजरातला आक्रमक ओपनर सोबतच विकेट किपर देखील मिळाला आहे. त्यामुळे टीमच्या टॉप ऑर्डरची मोठी चिंता मिटली आहे. गुजरातनं आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2022) मॅथ्यू वेड आणि ऋद्धीमान साहा या दोघांना टीममध्ये घेतले होते. त्यापैकी वेड पाकिस्तान विरूद्धच्या सीरिजमुळे पहिल्या मॅचपासून खेळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विकेट किपर म्हणून साहा हा एकच पर्याय गुजरातकडं सुरूवातीच्या टप्प्यात उपलब्ध होता.

जाहिरात

टी-20 मध्ये गुरबाजचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 69 टी-20 मध्ये त्याने 113 सिक्स लगावल्या आहेत.  गुरबाज पीएसएलमध्ये मुलतान सुलतान्स आणि इस्लामाबाद युनायटेडकडून, लंका प्रीमियर लीगमध्ये कॅन्डी टस्कर्सकडून आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायगर्सकडून खेळला आहे. त्याला खरेदी करण्यासाठी टीम मॅनेजमेंटनं राशिद खानचाही सल्ला घेतला आहे. IND vs NZ : टीम इंडियातील पदार्पणानंतर पहिल्यांदाच दिग्गज खेळाडू बाहेर, खराब फॉर्मचा फटका टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या टीमचा कॅप्टन आहे. तर अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान, टीम इंडियाचा तरूण खेळाडू शुभमन गिल, फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन हे गुजरातचे प्रमुख खेळाडू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात