जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या पहिल्या मॅचमध्ये 'या' 11 जणांना खेळवणार पांड्या

IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या पहिल्या मॅचमध्ये 'या' 11 जणांना खेळवणार पांड्या

IPL 2022 : गुजरात टायटन्सच्या पहिल्या मॅचमध्ये 'या' 11 जणांना खेळवणार पांड्या

गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) टीम कॅप्टन हार्दिकसह शुभमन गिल (Shubman Gill) आणि राशिद खान (Rashid Khan) यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये सोमवारी दोन नव्या टीममध्ये लढत होणार आहे. आयपीएलच्या 15 व्या सिझनमधील चौथी लढत गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Gujarat Titans vs Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. या दोन्ही टीम पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणाीर आहेत. गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तर लखनऊचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) आहे.  गुजरातची टीम कॅप्टन हार्दिकसह शुभमन गिल (Shubman Gill) आणि राशिद खान (Rashid Khan) यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या तीघांना गुजरातनं आयपीएल ऑक्शनपूर्वी ड्राफ्ट केले होते. हार्दिक पांड्या टी20 वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच खेळत आहे. त्याच्यावर या स्पर्धेत मोठा दबाव असेल. हार्दिकला चांगल्या बॅटींगबरोबरच बॉलिंगमध्येही उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे. त्यानंतरच त्याचा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी विचार होऊ शकेल. हार्दिकवर या आयपीएलमध्ये कॅप्टनसीचा अतिरिक्त दबाव अइसणार आहे. गुजरातकडं विजय शंकर (Vijay Shankar) हा आणखी एक महत्त्वाचा ऑल राऊंडर आहे. सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेला विजय शंकर शेवटच्या ओव्हर्समध्ये आक्रमक बॅटींग करू शकतो. तो प्लेईंग 11 मध्ये खेळणार हे नक्की आहे. त्याचबरोबर राहुल तेवातिया (Rahul Tewatiya) हा आणखी एक पॉवर हिटर गुजरातकडे आहे. तेवातियाकडं मोठे सिक्स मारण्याची क्षमता आहे.  गुजरातकडे डेव्हिड मिलर देखील आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मिलरकडं टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव असून एकहाती मॅच फिरवण्याची क्षमता आहे. राशिद खान आणि लॉकी फर्ग्युसन हे धोकादायक बॉलर गुजरातकडं आहेत. कोणत्याही टीमसाठी हे डोकेदुखी ठरू शकतात. राशिद खानला टी20 क्रिकेटमधील बेस्ट स्पिनर मानले जाते. तर लॉकी फर्ग्युसनचा भन्नाट वेग हा सर्वच बॅटर्सची परीक्षा घेणारा आहे. त्याचबरोबर अनुभवी मोहम्मद शमी देखील गुजरातकडं आहे. टीम इंडियाच्या टी20 टीममध्ये जागा मिळवण्यासाठी शमीसाठी ही आयपीएल स्पर्धा महत्त्वाची आहे. IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सला धक्का, भारतामध्ये येण्यापूर्वीच प्रमुख खेळाडू जखमी गुजरात टायटन्सची संभाव्य Playing 11 :  हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुभमन गिल, रहमानुल्लाह गुरबाज, ऋद्धीमान साहा, गुरकिरत सिंह मान, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवातिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात