मुंबई, 18 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मध्ये आणखी एक पराभव झाला. रविवारी रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) चेन्नईचा 3 विकेट्सनं पराभव केला. चेन्नईचा या स्पर्धेतील पाचवा पराभव आहे. या पराभवातही चेन्नईच्या फॅन्ससाठी एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. गेल्या पाच सामन्यांपासून त्यांना प्रतीक्षा असेलेली ऋतुराज गायकवाडची (Rituraj Gaikwad) दमदार बॅटींग अखेर गुजरात विरूद्ध दिसली. ऋतुराजनं गुजरात विरूद्ध आक्रमक अर्धशतक झळकावले. मागील सिझनमध्ये सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या ऋतुराजनं पहिल्या पाच मॅचमध्ये फक्त 35 रन केले होते. चेन्नईच्या खराब कामगिरीत ऋतुराजच्या अपयशाचाही मोठा वाटा होता. गुजरात विरूद्ध ऋतुराजनं या सिझनमधील पहिलं अर्धशतक झळकावलं. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खराब झाली. रॉबिन उथप्पा आणि मोईन अली झटपट आऊट झाले. त्यानंतर ऋतुराजनं अंबती रायुडूसोबत चेन्नईची इनिंग सावरली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 रनची भागिदारी केली. ऋतुराजनं 5 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीनं 73 रन केले. याचाच अर्थ त्यानं फक्त 10 बॉलमध्ये 50 रन काढले. ऋतुराजच्या या यशात टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) दिलेल्या टिप्सचा मोठा वाटा आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्धच्या मॅचनंतर ऋतुराजनं विराटशी बराच वेळ चर्चा केली होती. या चर्चेत विराटनं दिलेल्या टिप्स त्याच्या उपयोगी पडल्या, असं मानलं जात आहे.
ऋतुराजचं अर्धशतकही चेन्नईचा पराभव टाळू शकलं नाही. डेव्हिड मिलर आणि राशिद खान यांच्या तडाख्यापुढे चेन्नईचा आणखी एक पराभव झाला. डेव्हिड मिलरने (David Miller) 51 बॉलमध्ये नाबाद 94 रन केले, मिलरच्या या खेळीमध्ये 8 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. लवकर विकेट गेल्यानंतर राशिद खाननेही (Rashid Khan) मिलरला चांगली साथ दिली. राशिदने 21 बॉलमध्ये 40 रन केले. IPL 2022 : या 5 खेळाडूंमुळे बुडलं मुंबईचं जहाज, प्ले-ऑफमध्ये पोहोचणंही झालं अशक्य चेन्नईविरुद्धच्या या विजयासोबतच गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. गुजरातने आतापर्यंत 6 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला असून फक्त एकाच मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. गुजरातच्या खात्यात सध्या 10 पॉईंट्स आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने 6 पैकी फक्त एक मॅच जिंकली असून उरलेल्या 5 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांचे फक्त 2 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम नवव्या क्रमांकावर आहे.