मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CPL 2021: अंपायरच्या निर्णयावर नाराज पोलार्डनं केली अजब कृती, VIDEO VIRAL

CPL 2021: अंपायरच्या निर्णयावर नाराज पोलार्डनं केली अजब कृती, VIDEO VIRAL

कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) आक्रमक खेळ करत त्रिनबागो नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. या खेळीच्या दरम्यान त्यानं केलेली एक अजब कृती सध्या व्हायरल (Viral) झाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 1 सप्टेंबर : कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) आक्रमक खेळ करत त्रिनबागो नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. पोलार्डनं या मॅचमध्ये खराब सुरुवातीनंतर टीमला सावरले. त्यानं 6 फोर आणि 1 सिक्ससह 41 रन काढले. या खेळीच्या दरम्यान त्यानं केलेली एक अजब कृती सध्या व्हायरल (Viral) झाली आहे.

त्रिनबागो नाईट रायडर्सनं (TKR)  विरुद्ध सेंट लूसिया या मॅचमध्ये खराब अंपायरिंग पाहयला मिळाली. यावेळी कॅप्टन पोलार्डनं विरोध करायला मागं हटला नाही. 19 व्या ओव्हरमध्ये पोलार्ड आणि टिम सीफर्ट ही जोडी मैदानात होती. ही जोडी वेगानं रन करत असताना हा प्रसंग घडला.

वहाब रियाझ ती ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरचा पाचवा बॉल रियाझनं वाईड यॉर्कर टाकला. तो बॉल इतका लांब होता की, सीफर्टनं पूर्ण स्ट्रेच केल्यानंतरही तो तिथपर्यंत पोहचला नाही. पण, अंपायरनं तो बॉल वाईड दिला नाही.

इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता क्रिकेटपटू देश सोडणार, भारतीय खेळाडूंसोबत सुरू करणार करिअर

अंपायरच्या या निर्णयावर पोलार्ड नाराज होता. त्यानं त्याचा विरोध केला. हा विरोध दाखवण्यासाठी तो नॉन स्ट्रायकर एंड सोडून काही काळ मिड विकेटला जाऊन उभा राहिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या वेगानं व्हायरल होत आहे. पोलार्डनं अंपायरच्या निर्णयाचा विरोध करण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वी त्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं मैदानात विरोध केला आहे.

First published:

Tags: Cricket news, Kieron pollard