मुंबई, 5 मे : आयपीएल 2022 मधील (IPL 2022) 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात होणार आहे. हा सामना दिल्लीसाठी खूप महत्त्वाचा आहे. 'प्ले ऑफ' मध्ये जाण्यासाठी दिल्लीला ही मॅच जिंकणे आवश्यक आहे. पॉईंट टेबलमध्ये दिल्ली सध्या सातव्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंतची (Rishabh Pant) टीम ही मॅच जिंकण्यात अपयशी ठरली तर त्यांचा 'प्ले ऑफ' गाठण्याचा मार्ग खडतर होणार आहे.
या सिझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या टीम पहिल्यांदाच एकमेकांच्या विरूद्ध खेळणार असून दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. सनरायझर्सनं या सिझनमध्ये दिल्लीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत 9 सामने खेळले असून त्यापैकी 5 मध्ये विजय मिळवलाय. तर, 4 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. केन विल्यमसनची टीम 10 पॉईंट्ससह पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
DC vs SRH Dream 11 Team Prediction
कप्तान: डेव्हिड वॉर्नर
व्हाईस कॅप्टन: उमरान मलिक
विकेट किपर: ऋषभ पंत
बॅटर: राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, केन विलियमसन
ऑल राऊंडर्स: ललित यादव, अक्षर पटेल, एडन मार्कराम
बॉलर: टी नटराजन, कुलदीप यादव
IPL 2022 : डेव्हिड वॉर्नर घेणार SRH चा बदला! मॅचपूर्वी केलं मोठं वक्तव्य
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, मनदीप सिंग, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, खलील अहमद, अश्विन हेब्बार, रिपल पटेल, यश ढूल, विकी ओत्सवाल, लुंगी एनगिडी, टीम सायफर्ट, प्रवीण दुबे, रोव्हमन पॉवेल, ललित यादव
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन, निकोलस पूरन, एडन मार्करम, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, सुशांत मिश्रा, शशांक सिंग, सीन एबॉट, आर समर्थ, रोमारियो शेफर्ड, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फझलहक फारुकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Delhi capitals, Ipl 2022, SRH, Sunrisers hyderabad