मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : RCB ची हाराकिरी सुरूच, राजस्थानचा 'रॉयल' विजय

IPL 2022 : RCB ची हाराकिरी सुरूच, राजस्थानचा 'रॉयल' विजय

Photo- IPL/BCCI-Twitter

Photo- IPL/BCCI-Twitter

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीची (RCB vs RR) हाराकिरी सुरूच आहे. हैदराबादविरुद्ध 68 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध 145 रनचं आव्हान पार करणंही आरसीबीला शक्य झालं नाही.

  • Published by:  Shreyas

पुणे, 26 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीची (RCB vs RR) हाराकिरी सुरूच आहे. हैदराबादविरुद्ध 68 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध 145 रनचं आव्हान पार करणंही आरसीबीला शक्य झालं नाही. 19.3 ओव्हरमध्ये 115 रनवरच आरसीबी ऑल आऊट झाली. फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) सर्वाधिक 23 रन केल्या. राजस्थानकडून कुलदीप सेनला (Kuldeep Sen) सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, तर आर.अश्विनने 3 आणि प्रसिद्ध कृष्णाने 2 विकेट घेतल्या.

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर आरसीबीने राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 144/8 वर रोखलं. रियान परागच्या (Riyan Parag) 31 बॉलमध्ये नाबाद 56 रनच्या खेळीमुळे राजस्थानला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून सिराज, हेजलवूड, हसरंगा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर हर्षल पटेलला 1 विकेट घेण्यात यश आलं.

आरसीबीविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर गेली आहे. राजस्थानने 8 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला तर 2 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे. आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, त्यांनी 9 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

First published:

Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB