मुंबई, 18 एप्रिल : पंजाब किंग्ज विरूद्ध बुधवारी होणाऱ्या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्लीच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झाल्यानंतर टीम मॅनेजमेंटनं पुण्याला जाण्याचा नियोजित कार्यक्रम रद्द केला.सध्या दिल्लीचे सर्व सदस्य मुंबईतच क्वारंटाईन झाले आहेत. ‘पीटीआय’नं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या टीममधील ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरला कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये मिचेल मार्श (Mitchell Marsh) हा एकमेव ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर आहे. ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर असतानाच मार्श जखमी झाला होता. त्यानंतर पाकिस्तान विरूद्धची सीरिज न खेळता मार्श आयपीएल स्पर्धेसाठी दिल्लीच्या कॅम्पमध्ये दाखल झाला होता. मार्श फिट होण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) फिजियो पॅट्रिक फारहार्ट (Patrick Farhart) यांच्या संपर्कात होता. फारहार्ट काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्या संपर्कात असल्यानंच मार्शलाही कोरोनाची लागण झाल्याचं मानलं जात आहे. मिचेल मार्शनं दुखापतीनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विरूद्धच्या मॅचमध्ये दिल्लीकडून पदार्पण केले. या मॅचमध्ये त्यानं 24 बॉलमध्ये 14 रनची संथ खेळी केली होती. दुखापतीनंतर मार्शची पहिलीच मॅच असल्यानं तो संपूर्ण क्षमतेनं खेळू शकला नाही, या शब्दात कॅप्टन पंत आणि कोच पॉन्टिंगनं त्याचा बचाव केला होता. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सकडून या संपूर्ण विषयावर अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आयपीएल स्पर्धेवर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदा स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच याबाबत खास नियम बनवण्यात आले आहेत.नवीन नियमानुसार, मॅच सुरू होण्याआधीच एखाद्या टीममध्ये कुणाला कोरोनाची लागण झाली आणि ती टीम 12 खेळाडू उभे करू शकली नाही तर काही गोष्टी बदलू शकतात.मॅचआधी प्रत्येक टीमला 12 खेळाडूंची नावं जाहीर करणं बंधनकारक असतं. यामध्ये 11 खेळाडू हे प्रत्यक्ष मैदानावर खेळणारे तर एक जण बदली असतो. यामध्ये 7 खेळाडू भारतीय असणं आवश्यक असतं. हे सगळे म्हणजे 12 खेळाडू उपलब्ध झाले नाहीत, तर मॅचची तारीख बदलली जाऊ शकते. IPL 2022, RR vs KKR : राजस्थानमध्ये दिग्गज खेळाडू परतणार, श्रेयसकडं काय आहेत पर्याय? कोरोनामुळे एखादी टीम प्लेइंग इलेव्हन बनवू शकली नाही, तर सामन्याचं वेळापत्रक (timetable) बदललं जाईल. त्यानंतरही सामना होऊ शकला नाही, तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवलं जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.