Home /News /news /

IPL 2022, RR vs KKR : राजस्थानमध्ये दिग्गज खेळाडू परतणार, श्रेयसकडं काय आहेत पर्याय?

IPL 2022, RR vs KKR : राजस्थानमध्ये दिग्गज खेळाडू परतणार, श्रेयसकडं काय आहेत पर्याय?

KKR vs RR: केकेआरचा मागील दोन सामन्यांमध्ये पराभव झालाय. तर राजस्थाननंही गुजरात टायटन्स विरुद्धची लढत गमावली होती. त्यामुळे या लढतीमध्ये विजयाच्या ट्र्रॅकवर परतण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल.

    मुंबई, 18 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals) यांच्यात आयपीएल स्पर्धेतील 30 वा सामना आज (सोमवारी) होत आहे. केकेआरचा मागील दोन सामन्यांमध्ये पराभव झालाय. तर राजस्थाननंही गुजरात टायटन्स विरुद्धची लढत गमावली होती. त्यामुळे या लढतीमध्ये विजयाच्या ट्र्रॅकवर परतण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल. राजस्थानला गुजरात विरूद्ध प्रमुख फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्टची (Trent Boult) कमतरता जाणवली. लखनऊ विरूद्ध सुरूवातीलाच दोन विकेट्स घेत टीमला आघाडी मिळवून देणारा बोल्ट गुजरात विरूद्धच्या मॅचमध्ये अनफिट असल्यानं खेळू शकला नाही. बोल्ट पुढील मॅच खेळेल असं कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) त्याच दिवशी जाहीर केलं होतं. अनुभवी बोल्टच्या समावेशानं राजस्थानची टीम आणखी मजबूत होणार आहे. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं स्पर्धेची सुरूवात चांगली केली होती. पण, मागील 3 मॅचमध्ये त्यानं फक्त 32 रन केले आहे. केकेआर विरूद्ध सॅमसनकडून मोठ्या खेळीची टीमला अपेक्षा असेल. राजस्थानच्या जोस बटलरकडं ऑरेंज कॅप आहे. बटलरच्या जोडीला सॅमसनचीही बॅट चालली तर केकेआरची डोकेदुखी वाढू शकते. केकेआरची टीम मागील दोन मॅचमध्ये फारशी कमाल करू शकली नाही. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध विकेट किपर सॅम बिलिंग्स आजारी असल्यानं खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी टीममध्ये आलेला आरोन फिंच अपयशी ठरला होता. आता बिलिंग्स फिट झालाय.त्यामुळे केकेआर बिलिंग्सचा पुन्हा समावेश करणार की फिंचला आणखी एक संधी देणार हे पाहवं लागेल. IPL 2022, RR vs KKR Dream 11 Team Prediction : 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य राजस्थान रॉयल्सची संभाव्य Playing 11 : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, रस्सी व्हॅन डर डुसेन, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर. अश्विन, ट्रेंन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य Playing11 : व्यंकटेश अय्यर, आरोन फिंच, श्रेयस अय्यर, नितिश राणा, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, सुनील नरीन, उमेश यादव, अमन खान, वरूण चक्रवर्ती
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Ipl 2022, KKR, Rajasthan Royals

    पुढील बातम्या