मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : हैदराबादला हरवल्यानंतर डेव्हिड वॉर्नरनं जुन्या कॅप्टनसाठी लिहिली भावुक पोस्ट

IPL 2022 : हैदराबादला हरवल्यानंतर डेव्हिड वॉर्नरनं जुन्या कॅप्टनसाठी लिहिली भावुक पोस्ट

डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांचं नातं वितुष्ट होऊन संपुष्टात आलं. पण या टीममधील खेळाडूंसोबत त्याची अजूनही मैत्री कायम आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मे : डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) 92 रनच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्स हैदराबादचा (DC vs SRH) 21 रननी पराभव केला. वॉर्नरनं या खेळीतून हैदराबादचा बदला घेतला असं मानलं जातं आहे. वॉर्नर मागील आयपीएल सिझनपर्यंत हैदराबादच्याच टीममध्ये होता. पण, टीम मॅनेजमेंटसोबत झालेल्या मतभेदामुळे त्याला पहिल्यांदा कॅप्टनपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर प्लेईंग 11 मधून वगळण्यात आलं. त्याचवेळी वॉर्नर पुढील सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार नाही, हे स्पष्ट झाले होते.

वॉर्नर आणि सनरायझर्स हैदराबाद यांचं नातं वितुष्ट होऊन संपुष्टात आलं. पण या टीममधील खेळाडूंसोबत त्याची अजूनही मैत्री कायम आहे. गुरूवारची मॅच संपल्यानंतर वॉर्नरनं त्याचा माजी सहकारी आणि कॅप्टन केन विल्यमसनसोबत (Kane Williamson) एक इमोशल सेल्फी शेअर केली. 'भाई, मी तुला मिस करतो' असं भावुक कॅप्शन वॉर्नरनं हा सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिलं आहे. त्यावर सनरायझर्सचा माजी खेळाडू राशिद खाननंही (Rashid Khan) 'मी देखील मिस करत आहे', अशी प्रतिक्रिया दिली.

दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) देखील या दोन दिग्गज खेळाडूंचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये हे दोघं सेल्फी घेताना दिसत आहेत. 'क्रिकेट मैदानावरील तुम्हाला पाहयला आवडणाऱ्या गोष्टी' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

दिल्लीच्या या विजयामुळे पॉईंट्स टेबलची चुरस आता वाढली आहे. या विजयासोबत दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीने 10 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसरीकडे हैदराबाद सहाव्या क्रमांकावर आहे, त्यांनीही 10 पैकी 5 मॅच जिंकल्या आहेत आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे.

IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरनं मोडला गेलचा रेकॉर्ड, T20 क्रिकेटचा झाला बॉस

सनरायझर्स हैदराबादचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होणार असून दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. रविवारी होणारे हे दोन्ही सामने आयपीएल 'प्ले ऑफ' साठी महत्त्वाचे आहेत.

First published:

Tags: David warner, Delhi capitals, Ipl 2022, SRH