मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरनं मोडला गेलचा रेकॉर्ड, T20 क्रिकेटचा झाला बॉस

IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरनं मोडला गेलचा रेकॉर्ड, T20 क्रिकेटचा झाला बॉस

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) हा आयपीएल सिझन (IPL 2022) यशस्वी ठरतोय. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये (DC vs SRH) त्यानं टी20 क्रिकेटमधील एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मे : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरसाठी (David Warner) हा आयपीएल सिझन (IPL 2022) यशस्वी ठरतोय. यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणाऱ्या वॉर्नरनं आत्तापर्यंत 8 इनिंगमध्ये 59.33 च्या सरासरीनं 326 रन केले असून यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. गुरूवारी ब्रेबॉर्न स्टेडिअमवर झालेल्या मॅचमध्ये वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) विरूद्ध नाबाद 92 रन केले. या खेळीच्या दरम्यान त्यानं टी20 क्रिकेटमधील एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

डेव्हिड वॉर्नरनं सनरायझर्स विरूद्ध टी20 क्रिकेटमधील 89 वं अर्धशतक झळकावलं. क्रिकेटच्या या प्रकारात सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड आता वॉर्नरच्या नावावर झाला आहे. त्यानं वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला (Chris Gayle) मागं टाकलं आहे. गेलच्या नावावर 88 अर्धशतकं आहेत. या प्रकारात सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 77 अर्धशतक झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. टी20 क्रिकेटमध्ये फिंचनं 70 तर रोहितनं 69 अर्धशतक झळकावली आहेत.

जुन्या टीमचा घेतला बदला

डेव्हिड वॉर्नर 2014 पासून सनरायझर्स हैदराबादचा सदस्य होता. वॉर्नरच्याच कॅप्टनसीमध्ये सनरायझर्सनी 2016 साली आयपीएल विजेतेपद पटकावले होते. मात्र मागील सिझनमध्ये झालेल्या मतभेदानंतर सनरायझर्सच्या मॅनेजमेंटनं वॉर्नरची आधी कॅप्टनपदावरून आणि नंतर टीममधून हकालपट्टी केली. त्याला रिटेनही करण्यात आले नाही.

वॉर्नरनं या अपमानाचा पूर्ण बदला गुरूवारच्या मॅचमध्ये घेतला. वॉर्नरनं 58 बॉलमध्ये नाबाद 92 रन केले.  या खेळीत त्यानं 11 फोर आणि 3 सिक्स लगावले. वॉर्नरला या मॅचमध्ये शतकाची संधी होती. पण, त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये एकही बॉल खेळायला मिळाला नाही. वॉर्नरनं टीमचा विचार करत स्वत:चं शतकाचे बलिदान दिले.

IPL 2022 : विराट, रोहितच नाही तर आणखी एक चॅम्पियन ठरतोय फ्लॉप, 14 कोटी पाण्यात

दिल्लीची इनिंग संपल्यानंतर पॉवेलनं याबाबतचा खुलासा केला आहे. पॉवेल यावेळी म्हणाला की, 'मी एक रन काढतो त्यानंतर तू शतक पूर्ण कर असं वॉर्नरला शेवटच्या ओव्हरपूर्वी सांगितलं होतं. त्यावेळी वॉर्नरनं मला असं क्रिकेट खेळत नाहीत. तू तुला शक्य आहे तितकी आक्रमक बॅटींग करण्याचा प्रयत्न कर, असा सल्ला दिला.' वॉर्नरच्या या निस्वार्थी सल्ल्यानं त्याचं शतक हुकलं पण, दिल्लीला महत्त्वाचा विजय मिळाला.

First published:

Tags: Chris gayle, Cricket, David warner, Delhi capitals, Ipl 2022, SRH