मुंबई, 5 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सना (Mumbai Indians) धक्का बसला आहे. डावखुरा फास्ट बॉलर टायमल मिल्स (Tymall Mills) दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. टायमल मिल्सऐवजी मुंबईने दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतला बॅटर ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) याला टीममध्ये घेतलं आहे. झिम्ब्बावेविरूद्ध दक्षिण आफ्रिकन ए टीमकडून ट्रिस्टन स्टब्स खेळला होता. दक्षिण आफ्रिकेतल्या स्थानिक टी-20 मध्ये स्टब्सने उल्लेखनीय कामगिरी केली होती. स्टब्स आयपीएलचा उरलेला मोसम मुंबईकडून खेळेल.
Wishing our speedster Tymal Mills a rapid recovery 👊#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @tmills15 pic.twitter.com/c9w8ksK3GA
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022
टायमल मिल्सला नेमकी कोणती दुखापत झाली आहे, याबाबत मुंबई इंडियन्सने कोणतीही माहिती दिलेली नाही. काहीच दिवसांपूर्वी टायमल मिल्स याला दुखापत झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण मिल्सने हे वृत्त खोटं असून आपण फिट असल्याचं सांगितलं, यानंतर काही वेळातच मिल्सने हे ट्वीट डिलीट केलं, त्यामुळे गोंधळ आणखी वाढला.
Squad Update: Tristan Stubbs to replace Tymal Mills in #MumbaiIndians 2022 squad.#OneFamily #DilKholKe pic.twitter.com/kwSkrpvMct
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2022
टायमल मिल्स आयपीएलच्या या मोसमात मुंबईकडून 5 मॅच खेळला, यात त्याला 6 विकेट मिळाल्या. राजस्थानविरुद्ध केलेली 3/35 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली. 9 पैकी 8 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला असून फक्त एकच मॅच त्यांना जिंकता आली. पहिल्या 8 मॅच गमावल्यानंतर राजस्थानविरुद्धची मागची मॅच ते जिंकले. बॉलरनी केलेली खराब कामगिरी मुंबई इंडियन्सच्या सततच्या पराभवांचं प्रमुख कारण ठरले.