नवी मुंबई, 11 मे : दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा (Delhi Capitals vs Rajasthan Royals) 8 विकेटने पराभव केला आहे, त्यामुळे त्यांचं प्ले-ऑफचं (IPL 2022) आव्हान अजूनही कायम आहे. राजस्थानने दिलेल्या 161 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात अत्यंत खराब झाली होती. इनिंगच्या दुसऱ्याच बॉलला श्रीकर भरत शून्य रनवर आऊट झाला, यानंतर मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यात 144 रनची पार्टनरशीप झाली. मार्शने 62 बॉलमध्ये 89 रन केले, यात 5 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. याशिवाय वॉर्नरने 41 बॉलमध्ये नाबाद 52 रनची खेळी केली. ऋषभ पंत 4 बॉलमध्ये 13 रनवर नाबाद राहिला. राजस्थानकडून बोल्ट आणि चहलला 1-1 विकेट मिळाली. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीच्या बॉलरनी राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 160/6 वर रोखलं. आर.अश्विनने 38 बॉलमध्ये 50 रन केले, तर पडिक्कलने 48 रनची खेळी केली. दिल्लीकडून सकारिया, नॉर्किया आणि मिचेल मार्शला 2-2 विकेट मिळाल्या. प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला हा सामना जिंकणं गरजेचं होतं. या विजयासह दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आली आहे. दिल्लीने 12 पैकी 6 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 12 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत आणि 5 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







