जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 10 हजार रन करणारा दिग्गज नव्या बॉलरसमोर हतबल, 6 बॉलमध्ये 3 वेळा आऊट

IPL 2022 : 10 हजार रन करणारा दिग्गज नव्या बॉलरसमोर हतबल, 6 बॉलमध्ये 3 वेळा आऊट

IPL 2022 : 10 हजार रन करणारा दिग्गज नव्या बॉलरसमोर हतबल, 6 बॉलमध्ये 3 वेळा आऊट

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएल 2022 मधील पहिली मॅच गुरूवारी खेळला. टी20 वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ठरलेल्या वॉर्नरकडून दिल्लीला मोठी अपेक्षा होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 एप्रिल : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएल 2022 मधील पहिली मॅच गुरूवारी खेळला. टी20 वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ठरलेल्या वॉर्नरकडून दिल्लीला मोठी अपेक्षा होती. विशेषत: पृथ्वी शॉनं (Prithvi Shaw) आक्रमक अर्धशतक झळकावल्यानंतर आता वॉर्नर हल्ला चढवेल असं मानलं जात होतं, पण वॉर्नरला ते जमलं नाही. तो 12 बॉलमध्ये फक्त 4 रन काढून आऊट झाला. डेव्हिड वॉर्नरनं टी20 क्रिकेटमध्ये 10 हजापेक्षा जास्त रन केले आहेत. या क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेतील सर्वाधिक रन करणारा तो विदेशी खेळाडू आहे. हे सर्व रेकॉर्ड आणि भक्कम अनुभव पाठिशी असूनही वॉर्नर नवोदीत बॉलरविरूद्ध सातत्यानं फेल होत आहे. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्धच्या मॅचमध्ये लेग स्पिनर रवी बिश्नोईनं (Ravi Bishnoi) वॉर्नरला आऊट केलं. टीम इंडियामध्ये काही महिन्यांपूर्वीच पदार्पण केलेल्या बिश्नोईपुढे वॉर्नर नेहमीच हतबल ठरला आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात बिश्नोईनं त्याला गुरूवारी तिसऱ्यांदा आऊट केले. दोन्ही खेळाडू आजवर 3 वेळाच आमने-सामने आले आहेत. या प्रत्येक वेळी बिश्नोईनं वॉर्नरची विकेट घेतली आहे. वॉर्नरनं बिश्नोई विरूद्ध फक्त 6 बॉल खेळले असून यामध्ये 5 रनच्या मोबदल्यात त्याला बिश्नोईनं 3 वेळा आऊट केलं आहे. याचाच अर्थ बिश्नोईनं प्रत्येक दुसऱ्या बॉलवर वॉर्नरची विकेट घेतली आहे. IPL 2022 : दिल्लीमध्ये ALL IS NOT WELL, पंतनं पराभवानंतर काढला ‘या’ खेळाडूंवर राग लखनऊच्या स्पिनर्सची कमाल लखनऊचा दुसरा स्पिनर कृष्णप्पा गौतमनंही चांगली कामगिरी केली. गौतमला मागील सिझनमध्ये एकही मॅच खेळायला मिळाली नव्हती. त्यानं दिल्ली विरूद्ध 4 ओव्हर्समध्ये फक्त 23 रन देत एक विकेट घेतली. त्याचबरोबर त्यानं ऋषभ पंतला एक मेडन ओव्हरही टाकली. कृणाल पांड्यानं 2 ओव्हर्समध्ये 12 दिले. तर, वॉर्नरला पुन्हा एकदा जाळ्यात अडकवणाऱ्या रवी बिश्नोईनं 4 ओव्हर्समध्ये 22 रन देत 2 विकेट्स घेतल्या.  लखनऊच्या स्पिनर्सनं 10 ओव्हर्समध्ये 57 रन दिले आणि 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे दिल्लीला मोठा स्कोर करता आला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात