मुंबई, 29 एप्रिल : डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानं आत्तापर्यंत 6 मॅचमध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. गुरूवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये (DC vs KKR) वॉर्नरनं 42 रन केले. दिल्लीनं ही लढत 4 विकेट्सनं जिंकली. दिल्लीचा 8 मॅचमधील हा चौथा विजय आहे. डेव्हिड वॉर्नर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक रन करणारा विदेशी बॅटर आहे. त्याचबरोबर या टी20 लीगमध्ये दोन टीमच्या विरूद्ध 1000 रन करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. वॉर्नरनं केकेआर आणि पंजाब किंग्ज या दोन टीमच्या विरूद्ध 1000 पेक्षा जास्त रन केले आहेत. यापूर्वी रोहित शर्मानं केकेआर विरूद्ध तर शिखर धवननं सीएसके विरूद्ध हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. अन्य कोणत्याही खेळाडूला हा रेकॉर्ड करता आलेला नाही. डेव्हिड वॉर्नरनं पंजाब किंग्जच्या विरूद्ध 22 इनिंगमध्ये 53 च्या सरासरीनं 1005 रन केले असून यामध्ये 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 81 ही वॉर्नरची पंजाब विरूद्धची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यानं पंजाब किंग्ज विरूद्ध 142 च्या स्ट्राईक रेटनं 106 फोर आणि 37 सिक्स लगावले आहेत. तर केकेआर विरूद्ध वॉर्नरनं 26 इनिंगमध्ये 44 च्या सरासरीनं 1018 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं केकेआर विरूद्ध 146 च्या स्ट्राईक रेटनं 100 फोर आणि 40 सिक्स लगावले आहेत. रोहित शर्मानं केकेआरच्या विरूद्ध 1018 रन केले आहेत. युवराजनं सांगितलं रोहितच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव, धोनीचं उदाहरण देत BCCI कडं केली मागणी! VIDEO वॉर्नरनं आजवर आयपीएलमध्ये एकूण 156 मॅचमध्ये 42 च्या सरासरीनं 5710 रन केले आहेत. यामध्ये 4 शतक आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं एकूण टी20 कारकिर्दीमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त रन केले असून त्यामध्ये 8 शतक आणि 88 अर्धशतकं झळकावली आहेत. मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरनं ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.