मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : विराट, रोहितच नाही तर आणखी एक चॅम्पियन ठरतोय फ्लॉप, 14 कोटी पाण्यात

IPL 2022 : विराट, रोहितच नाही तर आणखी एक चॅम्पियन ठरतोय फ्लॉप, 14 कोटी पाण्यात

रोहित आणि विराटप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा असलेला आणखी एक दिग्गज या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) सपशेल फ्लॉप ठरला आहे.

रोहित आणि विराटप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा असलेला आणखी एक दिग्गज या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) सपशेल फ्लॉप ठरला आहे.

रोहित आणि विराटप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा असलेला आणखी एक दिग्गज या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) सपशेल फ्लॉप ठरला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 6 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) बड्या स्टारसाठी कसोटीचं ठरलं आहे. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) या सिझनमध्ये फॉर्मात नाहीत. विराटनं आत्तापर्यंत फक्त एक अर्धशतक झळकावलं आहे. तर रोहितला एकाही इनिंगमध्ये पन्नाशी पार करता आलेली नाही. रोहित आणि विराटप्रमाणेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा असलेला आणखी एक दिग्गज या सिझनमध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसनला (Kane Williamson) या ऑक्शनपूर्वी 14 कोटी रूपयांमध्ये रिटेन केले होते. सनरायझर्सनं डेव्हिड वॉर्नरला (David Warner) सोडून देत विलियमसनला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. वॉर्नर आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. त्यानं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 4 अर्धशतक झळकावली आहेत. दुसरिकडं विलियमसननं साफ निराशा केली आहे.

विलियमसननं 10 इनिंगमध्ये 22.11 च्या सरासरीनं 199 रन केले आहेत. यामध्ये त्यानं फक्त 1 अर्धशतक झळकावलं असून त्याचा स्ट्राईक रेट हा 96.13 इतका कमी आहे. विलियमसन हैदराबादकडून ओपनिंग करतो. टी20 क्रिकेटमध्ये ओपनरनं पहिल्या सहा ओव्हरच्या पॉवर प्लेचा फायदा घेत जास्तीत जास्त रन करणे आवश्यक असते. विलियमसनला तसं करता येत नसल्यानं अन्य बॅटर्सवरील प्रेशर वाढत आहे. त्याचा परिणाम हैदराबादच्या इनिंगवर होतोय.

विलियमसनच्या खराब फॉर्मचा परिणाम त्याच्या फिल्डिंगवरही झाला आहे. त्यानं दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या मॅचमध्ये  उमरान मलिकच्या बॉलिंगवर रोव्हमन पॉवेलचा सोपा कॅच विलियमसननं सोडला. त्यावेळी पॉवेल 14 बॉलमध्ये 18 रन काढून खेळत होता. पॉवेलनं या जीवदानाचा पूर्ण फायदा उठवला. त्यानं पुढील 20 बॉलमध्ये 245 च्या स्ट्राईक रेटनं 49 रन केले. उमरानच्या 20 व्या ओव्हरमध्ये पॉवेलनं 1 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीनं 19 रन काढले.

दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाला रोहित शर्माचे कोच देतायत मोफत प्रशिक्षण

पॉवेल 67 रन काढून नाबाद राहिला. विलियमसनच्या खराब फिल्डिंगमुळे हैदराबादला 49 रनचा फटका बसला. त्याची ही चूक मॅचमधील टर्निंग पॉईंट ठरली. हैदराबादनं विलियमसन प्रमाणेच अब्दुल समदलाही रिटेन केले होते. जम्मू काश्मीरच्या या आक्रमक खेळाडूला खराब फॉर्ममुळे प्लेईंग 11 मधून वगळण्यात आले आहे. भरवशाच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांचा फटका या टीमला बसला आहे.

First published:

Tags: Ipl 2022, SRH