मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 संदर्भातील मोठी बातमी! अहमदाबादची टीम खरेदी करणारा CVC ग्रुप संशयात, BCCI करणार कारवाई?

IPL 2022 संदर्भातील मोठी बातमी! अहमदाबादची टीम खरेदी करणारा CVC ग्रुप संशयात, BCCI करणार कारवाई?

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील नव्या फ्रँचायझींची घोषणा करुन दोन दिवस झाल्यानंतरच एक मोठा वाद समोर आला आहे.

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील नव्या फ्रँचायझींची घोषणा करुन दोन दिवस झाल्यानंतरच एक मोठा वाद समोर आला आहे.

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील नव्या फ्रँचायझींची घोषणा करुन दोन दिवस झाल्यानंतरच एक मोठा वाद समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 ऑक्टोबर: आयपीएल 2022 (IPL 2022) मधील नव्या फ्रँचायझींची घोषणा करुन दोन दिवस झाल्यानंतरच एक मोठा वाद समोर आला आहे. दुबईत सोमवारी झालेल्या लिलावात यपीएलच्या दोन नव्या टीमची (IPL New Teams) घोषणा झाली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊच्या (Lucknow) टीम पुढच्या मोसमापासून मैदानात उतरणार आहेत.  आरपीएसजी ग्रुपने लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली, तर सीव्हीसी कॅपिटलला (CVC Capital) अहमदाबादची टीम 5,166 कोटी रुपयांना मिळाली. आयपीएल लिलावाच्या आधीपासूनच अदानी ग्रुप (Adani Group) अहमदाबादची टीम विकत घेण्यात यशस्वी होईल, असं सांगण्यात येत होतं, पण सीव्हीसी ग्रुपने हा लिलाव जिंकत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

या घोषणेनंतर दोनच दिवसांनी अहमदाबादची टीम खरेदी करणारा CVC ग्रुप संशयात आला आहे. 'आऊटलुक'नं दिलेल्या वृत्तानुसार CVC कॅपिटलनं बेटींग आणि जुगार कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. 2013 साली उघडकीस आलेल्या बेटींग आणि फिक्सिंग प्रकरणामुळे आयपीएलची यापूर्वीच बदनामी झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या टीमचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सापडल्यानं त्यांच्यांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

आता त्यापाठोपाठ बेटींग आणि जुगारातील उद्योगात मोठी गुंतवणूक असलेल्या कंपनीला आयपीएल फ्रँचायझी देण्यात आल्यानं बीसीसीआयच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाला आहे.  या प्रकाराला भारतीय कायद्यानुसार बंदी आहे. आयपीएलचे माजी संचालक ललित मोदींनी देखील या विषयावर ट्विट करत बीसीसीआयवर टीका केली आहे.

या प्रकरणात सहभागी असलेल्या वरीष्ठ सूत्रांनी आऊटलूकला दिलेल्या माहितीनुसार अदानी ग्रुप याबाबतचे सर्व पर्याय तपासत आहे. त्यांच्याकडून याबाबत अधिकृत तक्रार देखील दाखल केली जाऊ शकते. लिलावापूर्वी झालेल्या पडताळणीमध्ये सीव्हीसी ग्रुपचे हे संबंध बीसीसीआयच्या लक्षात कसे आले नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

IPL 2022 Auction : आयपीएलच्या दोन नव्या टीमची घोषणा, अहमदाबाद-लखनऊ उतरणार मैदानात

कोण आहे सीव्हीसी कॅपिटल?

सीव्हीसी कॅपिटल युकेमधली इनव्हेस्टमेंट फर्म आहे. या कंपनीने नुकतेच ला लिगामध्ये 10 टक्के मीडिया राईट्स विकत घेतले आहेत. याशिवाय फॉर्म्युला वन आणि रग्बी टीमही सीव्हीसी कॅपिटलच्या नावावर आहे.अहमदाबादच्या टीमसाठी अदानी ग्रुपने 5 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती, पण सीव्हीसी कॅपिटलने जवळपास 200 कोटी रुपयांपेक्षा जास्तचं टेंडर दिल्यामुळे त्यांच्या नावावर अहमदाबादची टीम झाली आहे.

First published:

Tags: Ahmedabad, Ipl 2022, Ipl 2022 auction