दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएलच्या दोन नव्या टीमची (IPL 2022 Auction) घोषणा झाली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊ (Lucknow) या दोन टीम आता आयपीएल 2022 मध्ये मैदानात उतरतील, त्यामुळे आता आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 झाली आहे. आरपीएसजी ग्रुपने लखनऊ टीमला तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतलं, तर सीव्हीसी कॅपिटलला अहमदाबादची टीम 5,166 कोटी रुपयांना मिळाली. दुबईच्या ताज हॉटेलमध्ये झालेल्या या लिलाव प्रक्रियेत 10 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. अहमदाबादची टीम अदानी ग्रुपला मिळेल, अशी शक्यता सुरुवातीपासूनच वर्तवण्यात येत होती, पण आश्चर्यकारकरित्या सीव्हीसी ग्रुपला अहमदाबादच्या टीमची मालकी मिळाली.
Ahmedabad and Lucknow to be the two new teams at Indian Premier League (IPL). CVC Capital Partners gets Ahmedabad while RPSG Group gets Lucknow. pic.twitter.com/0zmQS7nQEb
— ANI (@ANI) October 25, 2021
अहमदाबाद, लखनऊ, कटक, धर्मशाला, गुवाहाटी आणि इंदूर या सहा शहरांमध्ये आयपीएलच्या नव्या टीमसाठीची स्पर्धा होती. प्रसिद्ध फूटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडचे मालक, अडानी ग्रुप (Adani Group), कोटक ग्रुप, अरबिंदो फार्मा, टोरेंट फार्मा या कंपन्या लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. एमएस धोनीचा मॅनेजर असलेल्या अरुण पांडे यांच्या रिठी स्पोर्ट्स या कंपनीने उद्योगपती आनंद पोदार यांच्या कंपनीसाठी कटकची टीम विकत घेण्यात रस दाखवला, पण बिडिंग करण्यासाठी रिठी स्पोर्ट्सला उशीर झाला, त्यामुळे त्यांचं टेंडर स्वीकारण्यात आलं नाही, असं वृत्त आहे.