मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : CSK च्या विजयानंतर धोनीनं सांगितली 'मन की बात', फॅन्सच्या व्यक्त केल्या भावना

IPL 2022 : CSK च्या विजयानंतर धोनीनं सांगितली 'मन की बात', फॅन्सच्या व्यक्त केल्या भावना

चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) रविवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 91 रननं मोठा पराभव केला.  या विजयानंतर सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) फॅन्सच्या भावना बोलून दाखवल्या.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 मे : आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीमपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) रविवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 91 रननं मोठा पराभव केला. या सिझनमध्ये झगडणाऱ्या सीएसकेनं रविवारच्या मॅचमध्ये लौकिकाला साजेसा खेळ केला. त्यांनी प्रत्येक विभागात दिल्लीवर मात केली. या विजयानंतर सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याच्या मनातील गोष्ट बोलून दाखवताना फॅन्सच्याच भावना मांडल्या आहेत.

सीएसकेनं दिलेल्या 209 रनचा पाठलाग करताना दिल्लीची टीम 17.4 ओव्हर्समध्ये 117 रनवर ऑल आऊट झाली. सीएसकेकडून मोईन अलीनं 3, तर ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांनी प्रत्येकी 2  विकेट्स घेतल्या. त्यापूर्वी डेव्हॉन कॉनवेनं 49 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीनं 87 रन काढले. त्यानं ऋतुराज गायकवाड (41) बरोबर पहिल्या विकेटसाठी 110 तर शिवम दुबे (32) बरोबर दुसऱ्या विकेटसाठी 59 रनची भागिदारी केली.

या विजयानंतर धोनीनं सांगितलं की, 'या प्रकारचा मोठ्या अंतरानं आधी विजय मिळाला असता तर चांगलं झालं असतं. ही आमच्यासाठी परफेक्ट मॅच होती. बॅटर्सनी चांगली कामगिरी केली. माझा टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा विचार होता. पण, या प्रकारच्या मॅचमध्ये टॉस हरणे देखील फायद्याचे असते.

ओपनर्सनी चांगली सुरूवात करत भक्कम पाया रचला. त्याची आम्हाला मदत झाली. त्यांचे बिग हिटर बॅटर्स सेट होऊ नये याची आम्हाला खबरदारी घ्यायची होती. सिमरजीत आणि मुकेश यांना परिपक्व होण्यास वेग लागला. सर्वच खेळाडू यासाठी त्यांचा वेळ घेतात,' असे धोनीने स्पष्ट केले.

CSK vs DC : कॉनवेची कमाल, मोईनची धमाल! धोनी ब्रिगेडचा 'दिल्ली'वर 91 धावांनी विजय! प्लेऑफसाठी चुरस

दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं चेन्नई सुपर किंग्सनं प्रत्येक विभागात सरस खेळ केल्याचं मान्य केलं. 'त्यांनी सर्व विभागात आम्हाला मागे टाकले. आता आम्हाला पुढील तीन मॅचवर लक्ष केंद्रीत करणे आमच्या हातामध्ये आहे. या मॅच आम्ही जिंकल्या तर क्वालिफाय करू. टीममधील खेळाडूंना ताप आल्याची तसंच कोव्हिडची लागण झाल्याची घटना घडली आहे. बरंच काही सुरू आहे. पण, आम्ही हे निमित्त देणार नाही. जास्तीत जास्त सकारात्मक राहणे आमच्या हातामध्ये आहे. आम्हाला चांगल्या मानसिक अवस्थेत राहण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.'

First published:

Tags: Csk, Delhi capitals, Ipl 2022, MS Dhoni