जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / CSK vs DC : कॉनवेची कमाल, मोईनची धमाल! धोनी ब्रिगेडचा 'दिल्ली'वर 91 धावांनी विजय! प्लेऑफसाठी चुरस

CSK vs DC : कॉनवेची कमाल, मोईनची धमाल! धोनी ब्रिगेडचा 'दिल्ली'वर 91 धावांनी विजय! प्लेऑफसाठी चुरस

CSK vs DC : कॉनवेची कमाल, मोईनची धमाल! धोनी ब्रिगेडचा 'दिल्ली'वर 91 धावांनी विजय! प्लेऑफसाठी चुरस

IPL 2022, CSK vs DC Live Score-Updates : आयपीएलच्या चालू हंगामातील 55 वा सामना मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर 4 वेळची चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने चौथ्यांदा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 मे : सलामीवीर डेव्हन कॉनवेच्या (Devon Conway) 87 धावांच्या खेळीनंतर मोईन अलीच्या (Moeen Ali) शानदार गोलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने (chennai super kings) आयपीएलच्या (IPL) 55व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (delhi capitals) 91 धावांनी पराभव केला. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर सीएसकेने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा अख्खा संघ 17.4 षटकांत केवळ 117 धावाच करू शकला. दिल्लीसाठी मिचेल मार्शने सर्वाधिक 25 धावांची खेळी खेळली. सीएसकेचा अकरा सामन्यांमधील हा चौथा विजय आहे. दुसरीकडे, दिल्लीचा अकरा सामन्यांमध्ये हा सहावा पराभव आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. DC ने 81 धावांच्या एकूण स्कोअरवर 5 विकेट गमावल्या. सलामीवीर श्रीकर भरतला मोईन अलीकडे झेलबाद करून सिमरजित सिंगने दिल्लीला मोठा धक्का दिला. भरतला 5 चेंडूत आठ धावा करता आल्या. यानंतर स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही 19 धावा करून बाद झाला. वॉर्नरला महिष टीकशॉने एलबीडब्ल्यू आऊट केले. मिचेल मार्श धावफलकावर 72 धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्शला मोईनने ऋतुराज गायकवाडच्या हाती झेलबाद करून पहिला बळी घेतला. मार्श 20 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. कर्णधार ऋषभ पंतने सुरुवातीला काही चांगले फटके मारले. पण, त्याला डाव पुढे नेता आला नाही. त्याला मोईनने बोल्ड करून दिल्लीला चौथा धक्का दिला. Ravindra Jadeja IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रवींद्र जडेजा संघाबाहेर का? MS धोनीने सांगितलं कारण पंतने 11 चेंडूत 21 धावा केल्या. मोईनने रिपल पटेलला आपला तिसरा बळी बनवला. रिपल 3 चेंडूत सहा धावा करून बाद झाला. अक्षर पटेल एका धावेवर मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर रोव्हमन पॉवेलला मुकेशने धोनीच्या हाती झेलबाद करून दिल्लीला सातवा धक्का दिला. रोव्हमन 9 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. कुलदीप यादव आठवा गडी म्हणून बाद झाला. सिमरनजीतने त्याला उथप्पाकरवी झेलबाद केले. चेन्नईकडून मोईन अलीने 3 तर मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी 2 बळी घेतले. तत्पूर्वी, ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली. ऋतुराज 33 चेंडूत 44 धावा करून बाद झाला. त्याला अक्षर पटेलने एनरिक नॉर्खियाकरवी झेलबाद केले. गायकवाडने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. यानंतर शिवम दुबेने वेगवान खेळी खेळली. शिवम दुबेची 19 चेंडूत 32 धावांची खेळी शिवमने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. मिचेल मार्शने शिवमला डेव्हिड वॉर्नरकरवी झेलबाद केले. अंबाती रायुडू सहा चेंडूत पाच धावा काढून बाद झाला. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात वेगवान गोलंदाज खलील अहमदच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन रायडू पॅव्हेलियनमध्ये परतला. मोईन अली आणि रॉबिन उथप्पाला सलग दोन चेंडूंवर एनरिक नॉर्खियाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मोईन धावा करून बाद झाला नसेल तोच नॉर्खियाने उथप्पाला खातेही उघडू दिले नाही. दिल्लीकडून नॉर्खियाने तीन तर खलीलने दोन गडी बाद केले. एक विकेट मार्शच्या खात्यात गेली.

Shimron Hetmyer IPL 2022: राजस्थान संघाला मोठा धक्का! मॅचविनर खेळाडू गेला मायदेशी, पण, कारण आहे गोड

डेव्हन कॉनवेची आरसीबीविरुद्ध 85 धावांची खेळी यापूर्वी, आयपीएलच्या 15 व्या मोसमात, डेव्हॉन कॉनवेने आयपीएलच्या 49 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 55 चेंडूत नाबाद 85 धावांची खेळी केली होती. IPL 2022 च्या पहिल्या 8 सामन्यात रवींद्र जडेजा कर्णधार होता. त्याने डावखुरा फलंदाज डेव्हन कॉनवेला अवघ्या एका सामन्यात संधी दिली. यानंतर सीएसकेने कॉनवेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. पण, महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा कर्णधार येताच त्याने कॉनवेला सलग तिसऱ्या सामन्यात संधी दिली. कॉनवे नुकताच लग्नानंतर आयपीएलमध्ये परतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात