मुंबई, 9 मे : महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) पुन्हा कॅप्टन झाल्यापासून सीएसकेनं दुसरा विजय मिळवला आहे. रविवारच्या मॅचमध्ये सीएसकेनं दिल्लीचा 91 रननं पराभव केला. या मॅचमध्ये धोनीनं फक्त 8 बॉलमध्ये नाबाद 21 रनची खेळी केली. धोनी अनेकदा बॅटींगला येण्यापूर्वी बॅट खाताना दिसतो. धोनीच्या या सवयीचं कारण त्याचा जुना सहकारी अमित मिश्रानं (Amit Mishra) सांगितलं आहे. टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा कॅप्टन धोनी बॅटला साफ करण्यासाठी असं करतो असं मिश्रा म्हणाला. बॅटींगच्या दरम्यान धोनीच्या बॅटवर एकही टेप किंवा दोरा दिसणार नाही, असंही मिश्रानं सांगितलं. त्यानं एक खास ट्विट करत हा खुलासा केला आहे.
In case you’re wondering why Dhoni often ‘eats’ his bat. He does that to remove tape of the bat as he likes his bat to be clean. You won’t see a single piece of tape or thread coming out of MS’s bat. #CSKvDC #TATAIPL2022
— Amit Mishra (@MishiAmit) May 8, 2022
‘धोनी अनेकदा त्याची बॅट का खातो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो हे बॅटवरील टेप काढण्यासाठी करतो. त्याला स्वच्छ बॅट आवडते. तो खेळताना त्याच्या बॅटवर एकही टेप किंवा दोरा निघालेला दिसणार नाही,’ असा खुलासा मिश्रानं केला आहे. IPL 2022 : RCB चे फायनलचे तिकीट निश्चित, 6 वर्षांनी आला खास योग! अमित मिश्रा आयपीएल स्पर्धेतील यशस्वी बॉलरपैकी एक आहे. तो मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्स टीमचा सदस्य होता. त्याला यावर्षी एकाही आयपीएल टीमनं खरेदी केलं नाही. सध्या तो सोशल मीडियावर आयपीएल मॅचमधील वेगवेगळ्या विषयांवर मत व्यक्त करत असतो. दुसरिकडं महेंद्रसिंह धोनी हा सध्या चांगलाच फॉर्मात आहे. त्यानं या सिझनच्यापूर्वी रविंद्र जडेजाकडं सीएसकेची कॅप्टनसी सोपवली होती. पण, टीमच्या खराब कामगिरीमुळे तो पुन्हा कॅप्टन झाला आहे. धोनी कॅप्टन झाल्यापासून सीएसकेनं 3 पैकी 2 सामने जिंकले असून एकामध्ये पराभव सहन केला आहे.