Home /News /sport /

IPL 2022 : CSK चा तरूण खेळाडू बनला 'पॉवर प्ले' किंग, मोहम्मद शमीलाही टाकलं मागं

IPL 2022 : CSK चा तरूण खेळाडू बनला 'पॉवर प्ले' किंग, मोहम्मद शमीलाही टाकलं मागं

चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) या आयपीएल सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सीएसकेच्या पराभवातही त्यांच्या एका तरूण बॉलरनं रेकॉर्ड केला आहे.

    मुंबई, 13 मे : मुंबई इंडियन्सनं गुरूवारी रात्री झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (MI vs CSK) 5 विकेट्सनं पराभव केला. या पराभवाबरोबरच सीएसकेचं या सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या मॅचमध्ये सीएसकेची टीम पहिल्यांदा बॅटींग करताना फक्त 97 रनवर ऑल आऊट झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सनं हे आव्हान 31 बॉल आणि 5 विकेट्स राखत पूर्ण केले. चेन्नईचा डावखुरा फास्ट बॉलर मुकेश चौधरीनं (Mukesh Chaudhary) या मॅचमध्ये भेदक बॉलिंग केली. त्यानं 4 ओव्हरमध्ये 23 रन देत 3 विकेट्स घेतल्या. पहिल्या ओव्हरच्या पाचव्याच बॉलवर त्यानं इशान किशनला आऊट केलं. इशाननं फक्त 6 रन केले. त्यानंतर त्यानं डॅनियल सॅम्सला एलबीडब्ल्यू आऊट केलं. तर मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या ट्रिस्टर स्टब्सला तर मुकेशनं खातंही उघडू दिलं नाही. मुकेशनं पॉवर प्लेमध्ये 3 विकेट्स घेत मुंबईला अडचणीत आणलं होतं. यावेळी त्यानं एक खास रेकॉर्डही केला. मुकेश आता या आयपीएल सिझनचा 'पॉवर प्ले' किंग झाला आहे. त्यानं 'पॉवर प्ले' मध्ये सर्वाधिक 11 विकेट्स घेतल्या आहेत. पहिलाच आयपीएल सिझन खेळणाऱ्या मुकेशनं टीम इंडिया आणि गुजरात टायटन्सचा अनुभवी बॉलर मोहम्मद शमीलाही मागं टाकलं आहे. शमीनं 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर कागिसो रबाडा आणि उमेश यादव यांच्या नावावर 'पॉवर प्ले' मध्ये प्रत्येकी 8 विकेट्स आहेत. IPL 2022 : मुंबईने बुडवलं चेन्नईचं जहाज, CSK च्या प्ले-ऑफच्या स्वप्नांना सुरूंग सीएसकेने दिलेल्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना मुकेशच्या बॉलिंगमुळे मुंबईची अवस्था 4 आऊट 33 अशी झाली होती, पण तिलक वर्माने 32 बॉलमध्ये नाबाद 34 रनची खेळी केली. तिलकनं ऋतिक शौकीनसोबत पाचव्या विकेटसाठी 48 रनची भागिदारी करत मुंबईला सावरलं. मुंबईने या मोसमात 12 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 9 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. तर सीएसकेने 12 पैकी 4 मॅच जिंकल्या तर 8 मॅचमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, Mumbai Indians

    पुढील बातम्या