मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : RCB चे फायनलचे तिकीट निश्चित, 6 वर्षांनी आला खास योग!

IPL 2022 : RCB चे फायनलचे तिकीट निश्चित, 6 वर्षांनी आला खास योग!

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील एक लोकप्रिय टीम आहे. विराट कोहलीसारख्या (Virat Kohli) दिग्गज खेळाडूचा समावेश असलेल्या टीमच्या फॅन्सची संख्या मोठी आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 मे :  रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील एक लोकप्रिय टीम आहे. विराट कोहलीसारख्या (Virat Kohli) दिग्गज खेळाडूचा समावेश असलेल्या टीमच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. पण, त्यांना आजवर एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावता आलेलं नाही. तसंच 2016 नंतर या टीमनं एकदाही फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. या सिझनमध्ये आरसीबीनं आत्तापर्यंत 12 पैकी 7 सामने जिंकले असून 14 पॉईंट्ससह ही टीम चौथ्या क्रमांकावर आहे.

रविवारी झालेल्या मॅचमध्ये आरसीबीनं सनरायझर्स हैदराबादचा (RCB vs SRH) 67 रननं पराभव केला. आरसीबीनं दिलेलं 193 रनचं आव्हान हैदराबादला झेपलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 125 रनवर ऑल आऊट झाली. आरसीबीकडून हसरंगानं 5 विकेट्स घेतल्या. या विजयानंतर आरसीबी फायनलमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण, 6 वर्षांनी एक खास योग आरसीबीच्या बाबतीमध्ये घडला आहे.

आरसीबी गेल्या अनेक वर्षांपासून पर्यायवरण बचावासाठी जागृती करण्यासाठी एक मॅच हिरवी जर्सी घालून खेळते. 2011 आणि 2016 सालचा अपवाद वगळता दरवर्षी हिरवी जर्सी घातल्यानंतर आरसीबीचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे याच दोन सिझनमध्ये आरसीबीनं आयपीएल फायनलमध्ये धडक मारली आहे. 2016 नंतर तब्बल 6 वर्षांनी आरसीबीनं हिरव्या जर्सीमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदा आरसीबीची टीम फायनलमध्ये जाईल असं मानलं जात आहे.

IPL 2022 : धोनीनं केली मित्राची मदत, CSK च्या विजयाचा 'या' टीमला मोठा फायदा

आरसीबीचं टॉप 4 मधील स्थान सीएसकेमुळेही भक्कम झालं आहे. सीएसकेनं रविवारच्या दुसऱ्या मॅचमध्ये पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा 91 रननं मोठा पराभव केला. यामुळे आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये आता 4 पॉईंट्सचे अंतर आहे. तसंच दिल्लीचा रनरेट देखील या विजयानं कमी झाला आहे. सीएसकेचा हा विजय देखील आरसीबीसाठी एक चांगला संकेत आहे.

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, RCB, SRH