मुंबई, 27 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) वाटचाल निराशाजनक झाली आहे. सीएसकेनं आत्तापर्यंत 6 सामने गमावले आहेत. त्यामुळे ‘प्ले ऑफ’च्या शर्यतामध्ये राहण्यासाठी आता त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहेत. या निराशाजनक कामगिरीनंतरही सीएसकेनं अंडर 19 वर्ल्ड कपमधील स्टार आणि तुळजापूरचा फास्ट बॉलर राजवर्धन हंगर्गेकरला (Rajvardhan Hangargekar) खेळवलेलं नाही. 20 लाख रुपयांची बेस प्राईज असलेल्या हंगर्गेकरला सीएसकेने 1.50 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. राजवर्धनचं आयपीएलमध्ये पदार्पण कधी होणार ? हा प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. सीएसकेचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंगनं (Stephen Fleming) या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सीएसकेच्या अधिकृत वेबसाईटशी बोलताना फ्लेमिंगनं सांगितलं की, ‘आम्हाला तरूण खेळाडूंच्या बाबतीमध्ये खूप सावध राहावं लागेल. राजवर्धननं अंडर-19 स्पर्धेत चांगली कामगिरी केलीय, हे मला माहिती आहे. पण, ही त्याच्या पुढची पायरी आहे. आम्हाला त्याच्यातील प्रतिभेची जाणीव आहे. थेट मॅचमध्ये खेळवून त्याचं नुकसान करण्याची आमची इच्छा नाही. त्याच्यातील क्षमतेची जाणीव त्याला व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. तो आमच्या अतिशय उत्तर अशा कार्यक्रमाचा भाग आहे. त्यानं यापूर्वी काही मोठे सामने खेळले आहेत. यावर्षी त्याच्यासाठी संधी निर्माण झाली तर आम्ही त्याला नक्की खेळवू. मोठ्या स्टेजवर बॉलिंग कशी करायची हे शिकणे खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला त्याच्यातील गुणवत्तेशी खेळ करायचा नाही,’ असे फ्लेमिंगने स्पष्ट केले. IPL 2022 : ‘मी तेंव्हा 3-4 रिमोट तोडले,’ क्वारंटाईनमधून बाहेर येताच पॉन्टिंगचा मोठा खुलासा ऑलराऊंडर असलेल्या राजवर्धन हंगर्गेकरने भारताला अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्याकडे त्याने या स्पर्धेत 5 विकेट्स घेतल्या. युगांडा विरूद्धच्या सामन्यात 8 रन देत 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. राजवर्धन बॉलिंगसह चांगली बॅटींग देखील करतो. आयर्लंड विरूद्ध 17 बॉलमध्ये नाबाद 39 रनची आक्रमक खेळी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







