जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'मी तेंव्हा 3-4 रिमोट तोडले,' क्वारंटाईनमधून बाहेर येताच पॉन्टिंगचा मोठा खुलासा

IPL 2022 : 'मी तेंव्हा 3-4 रिमोट तोडले,' क्वारंटाईनमधून बाहेर येताच पॉन्टिंगचा मोठा खुलासा

IPL 2022 : 'मी तेंव्हा  3-4 रिमोट तोडले,' क्वारंटाईनमधून बाहेर येताच पॉन्टिंगचा मोठा खुलासा

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) वाटचाल साधारण झाली आहे. दिल्लीनं 7 पैकी 4 सामने गमावले असून पॉईंट टेबलमध्ये ही टीम सातव्या क्रमांकावर आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची (Delhi Capitals) वाटचाल साधारण झाली आहे. दिल्लीनं 7 पैकी 4 सामने गमावले असून पॉईंट टेबलमध्ये ही टीम सातव्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सला विजयाच्या मार्गावर परत येण्यासाठी लय पकडणे आवश्यक आहे, असं मत दिल्लीचा हेड कोच रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) व्यक्त केलंय. पॉन्टिंगच्या घरातील जवळच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानं तो पाच दिवस क्वारंटाईन होता. क्वारंटाईनमधून बाहेर आल्यानंतर त्यानं त्या काळातील अनुभव सांगितला आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Delhi Capitals vs Rajasthan Royals) यांच्यातील मॅच चांगलीच वादग्रस्त झाली. ती मॅच बंद खोलीत पाहण्याचा अनुभव खूप त्रासदायक होता, असे पॉन्टिंगने सांगितले. ‘मी त्या मॅचच्या दरम्यान तीन-चार रिमोट तोडले. तसंच काही पाण्याच्या बाटल्या भिंतीवर फेकल्या. त्या मॅचमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडल्या नाहीत. आता त्यामधून कमबॅक करणे चांगले आहे,’ असा अनुभव क्वारंटाईनमधून बाहेर आलेल्या पॉन्टिंगनं सांगितला, पॉन्टिंग यावेळी पुढे म्हणाला की, ‘तुम्ही कोच असूनही तुमच्या नियंत्रणात गोष्टी नसतील तर अवघड आहे. अन्य टीमच्या तुलनेत आमच्या टीममध्ये कोरोना पेशंट्स जास्त आढळले. आता या सर्वांमधून बाहेर पडत दुसऱ्या हाफमध्ये टीममध्ये चांगला खेळ करून विजय मिळवेल. IPL 2022, SRH vs GT : हार्दिक पांड्याच्या गुजरातला हैदराबादचं चॅलेंज! अशी असेल दोन्ही टीमची Playing11 मला विश्वास आहे की, आम्ही विजयाच्या मार्गावर परत येण्याच्या अगदी जवळ आहोत. आम्हाला स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल. आम्हाला सकारात्मक राहण्याची गरज आहे. आम्ही पुनरागमनाची जितका जास्त प्रयत्न करू तितकं आमच्यासाठी अवघड होईल. त्यामुळे दुसऱ्या हाफमध्ये खेळताना खेळाडूंनी गरजेपेक्षा जास्त तणाव घेऊ नये. सध्या परिस्थितीमध्ये संयम आवश्यक आहे. आमची टीम चांगली आहे, पण निकाल आमच्या बाजूने नाहीत,’ असं पॉन्टिंगनं यावेळी स्पष्ट केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात