जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 17 बॉलमध्ये निश्चित झाला CSK चा विजय, RCB चे बॉलर्स विसरणार नाहीत 'ती' धुलाई

IPL 2022 : 17 बॉलमध्ये निश्चित झाला CSK चा विजय, RCB चे बॉलर्स विसरणार नाहीत 'ती' धुलाई

IPL 2022 : 17 बॉलमध्ये निश्चित झाला CSK चा विजय, RCB चे बॉलर्स विसरणार नाहीत 'ती' धुलाई

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 5 सामन्यांमधील हा पहिलाच विजय आहे. 17 बॉलमध्ये या सामन्याचा निकाल निश्चित झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मधील मंगळवारी झालेल्या सामन्यांत चेन्नई सुपर किंग्सनं आरसीबाीचा (RCB vs CSK) 23 रननं पराभव केला. सीएसकेचा 5 सामन्यांमधील हा पहिलाच विजय आहे. सीएसकेनं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 216 असा दमदार खेळ केला. त्याला उत्तर देताना आरसीबीला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 193 रन करता आले. आरसीबीचा 5 सामन्यांमधील हा दुसरा पराभव आहे. सीएसकेकडून ओपनर रॉबिन उथप्पानं कमाल बॅटींग केली. त्यानं 50 बॉलमध्ये 88 रन केले. या खेळीत उथप्पानं 4 फोर आणि 9 सिक्स लगावले. तर शिवम दुबेनं 47 बॉलमध्ये नाबाद 95 रनची खेळी केली. शिवमनं 5 फोर आणि 8 सिक्सचा वर्षाव केला. या दोघांनी लगावलेल्या 17 सिक्सनं सामन्याची दिशा निश्चित झाली. कुणाला किती सिक्स? आरसीबीकडून 6 जणांनी बॉलिंग केली. त्या सर्वांना सिक्स लगावण्यात आले. फास्ट बॉलर आकाशदीप आणि ऑफ स्पिनर ग्लेन मॅक्सवेलला सर्वाधिक 4-4 सिक्स लगावण्यात आले. जोश हेजलवूड आणि वानिंदू हसरंगाला प्रत्येकी 3 सिक्स पडले. मोहम्मद सिराजला 2 तर शाहबाज अहमदच्या बॉलिंगवर 1 सिक्स लगावण्यात आला. आरसीबीकडून आकाशदीप सर्वात महागडा ठरला. त्यानं 4 ओव्हर्समध्ये 58 रन दिले. आरसीबीला फास्ट बॉलर हर्षल पटेलची कमतरता जाणवली. हर्षल वैयक्तिक कारणांमुळे हा सामना खेळू शकला नाही.आरसीबीकडून वानिंदु हसरंगाला 2 आणि जॉश हेजलवूडला 1 विकेट घेण्यात यश आलं. IPL 2022 : CSK पासून प्रेरणा घेत मुंबई इंडियन्स करणार पुनरागमन! रोहित शर्माला मोठी संधी आरसीबीकडून मॅक्सवेलनं 11 बॉलमध्ये 26, शाहबाज अहमदने 27 बॉलमध्ये 41, सुयश प्रभुदेसाईने 18 बॉलमध्ये 34 आणि दिनेश कार्तिकने 14 बॉलमध्ये 34 रनची खेळी केली, पण तरीही आरसीबीला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. सीएसकेने मोसमातला पहिला विजय मिळवल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये ते नवव्या क्रमांकावर पोहोचले आहेत, तर मुंबई इंडियन्स आता शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे आरसीबी पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: csk , ipl 2022 , RCB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात