मुंबई, 13 एप्रिल : आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक दिवस आणि त्या दिवशी होणारा सामना नवा असतो. त्या सामन्यात चांगला खेळ केला तर मॅचचा निकाल बदलण्यास वेळ लागत नाही. सलग चार पराभवानंतर शेवटच्या क्रमांकावर फेकलेल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) मंगळवारी हे सिद्ध केलं. त्यांनी पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) विरूद्ध हे दाखवून दिलं आहे. सीएसकेचा हा विजय मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) प्रेरणा देणारा आहे. दोन्ही टीमची सारखी अवस्था मुंबई इंडियन्सची (आज) पंजाब किंग्ज विरूद्ध लढत होणार आहे. या सामन्यात उतरताना मुंबईची अवस्था ही देखील सीएसकेची मंगळवारी होती तशीच आहे. मुंबईनंही पहिले चारही सामने गमावले असून टीम पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटी आहे. त्या परिस्थितीमध्ये सीएकेनं मिळवलेला विजय हा मुंबईला प्रेरणा देणारा ठरू शकतो. मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह हे मॅच विनर आहेत. या खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्धी टीम कमी लेखणार नाही. या सर्वांनी त्यांच्या क्षमतेनुसार खेळ केला तर टीमचा विजय नक्की आहे. IPL 2022 : CSK चा अखेर विजय, दुबे-उथप्पाच्या वादळाचा RCB ला तडाखा इतिहासापासून प्रेरणा मुंबई इंडियन्सला पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये सीएसकेच्या विजयासह त्यांच्या स्वत:च्या इतिहासापासूनही प्रेरणा घेता येऊ शकते. यापूर्वी देखील मुंबईनं खराब सुरूवातीनंतर कमबॅक केलं आहे. 2008 साली झालेल्या आयपीएलमध्ये मुंबईनं पहिले चार सामने हरले होते. त्यानंतर पुन्हा खेळ उंचावत पाचवा क्रमांक पटकावला. 2014 साली देखील पहिले 4 सामने गमावल्यानंतर मुंबईनं कमबॅक करत ‘प्ले ऑफ’ मध्ये जागा मिळवली होती. इतकंच नाही तर 2015 साली 4 सामने गमावल्यानंतर मुंबईनं थेट विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे हा इतिहास रोहित शर्माच्या टीमला नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.