मुंबई, 23 डिसेंबर : यावर्षीच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) शेवटच्या क्रमांकावर राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) आगामी सिझनची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यांनी टीमच्या नव्या कोचिंग स्टाफची घोषणा केली आहे. टॉम मूडी हैदराबादचे हेड कोच म्हणून कायम असतील. त्याचबरोबर ब्रायन लारा (Brian Lara) आणि डेल स्टेन (Dale Steyn) या दोन दिग्गजांची हैदराबादने कोचिंग स्टाफमध्ये नियुक्ती केली आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात वैयक्तिक 400 रनची खेळी करणारा एकमेव क्रिकेटपटू असलेल्या ब्रायन लाराची सनरायझर्सचा रणनीती सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लारानं टेस्ट क्रिकेटमध्ये 34 शतक आणि 48 अधर्शतकांसह 11953 रन काढले आहेत. तर वन-डेमध्ये त्याने 19 शतकांच्या जोरावर 10405 रन काढले आहेत. त्याचप्रमाणे एका फर्स्ट क्लास इनिंगमध्ये 501 रन करण्याचा रेकॉर्डही लाराच्या नावावर आहे. लाराच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या खेळींचे रेकॉर्ड असून त्यामध्ये इंग्लंड विरुद्ध 375 आणि 400 या दोन इनिंगचा समावेश आहे.
Introducing the new management/support staff of SRH for #IPL2022!
— SunRisers Hyderabad (@SunRisers) December 23, 2021
Orange Army, we are #ReadyToRise! 🧡@BrianLara #MuttiahMuralitharan @TomMoodyCricket @DaleSteyn62 #SimonKatich @hemangkbadani pic.twitter.com/Yhk17v5tb5
तर, बॉलिंग कोच डेल स्टेननं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 699 विकेट्स घेतल्या आहेत. 93 टेस्टमध्ये 439 विकेट्स घेतल्या आहे. त्याचबरोबर 125 वन-डे मध्ये 196 आणि 47 टी20 इंटरनॅशनलमध्ये 64 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तो आयपीएल 2020 मध्ये (IPL 2020) आरसीबीकडून खेळला होता. IPL 2022: अहमदाबादच्या टीमबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर सायमन कॅटीचची असिस्टंट कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानीवर फिल्डिंग कोच आणि स्काऊट अशी दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हैदराबादचा मेंटॉर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (VVS Laxman) आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) संचालक बनला आहे. तर माजी हेड कोच ट्रेवर बेलिस आणि बॅटींग कोच ब्रॅड हॅडीन यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.