मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : KL राहुलच्या लखनऊला धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट

IPL 2022 : KL राहुलच्या लखनऊला धक्का, प्रमुख खेळाडू स्पर्धेतून आऊट

लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) ही टीम या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे. लखनौनं पहिल्याच आयपीएलसाठी जय्यत तयारी सुरू केलीय. त्यांच्या या तयारीला धक्का बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 मार्च : आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) सुरू होण्यास आता एक आठवडा उरला आहे. हा सिझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) ही टीम या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणार आहे. लखनौनं पहिल्याच आयपीएलसाठी जय्यत तयारी सुरू केलीय. टीम इंडियाचा ओपनर केएल राहुल (KL Rahul) या टीमचा कॅप्टन आहे. तर गौतम गंभीर (Gautam Gambhir) मेंटॉर आहे. आयपीएल स्पर्धेच्या ऐन तोंडावर लखनऊ टीमला मोठा धक्का बसला आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर मार्क वूड (Mark Wood) यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. इंग्लंड विरूद्ध वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या दरम्यान वूड जखमी झाला (Elbow injury) होता. या दुखापतीमुळे तो दुसऱ्या टेस्टमधूनही बाहेर आहे. वूड पुढील आठवड्यात इंग्लंडला परतणार आहे. तो उर्वरित वेस्ट इंडिज सीरिज आणि आयपीएस स्पर्धेत खेळणार नाही, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डानं (ECB) स्पष्ट केले आहे.

मार्क वूडमध्ये प्रती तास 140 किमीपेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करण्याची क्षमता आहे. त्याची ही क्षमता लक्षात घेऊन लखनऊने त्याला 7.5 कोटींमध्ये खरेदी केले होते. पण, तो या स्पर्धेतून आऊट झाल्यानं लखऊनला मोठा धक्का बसलाय. या आयपीएलमधून बाहेर पडलेला मार्क वूड हा इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सचा जेसन रॉय आणि कोलकाता नाईट रायडर्सचा अ‍ॅलेक्स हेल्स यांनी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे.

मार्क वूडची ही दुखापत इंग्लंडचा दुसरा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरसारखीच (Jofra Archer) आहे असं मानलं जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये वूडचा सहभाग अनिश्चित आहे.

PAK vs AUS : इम्रान खानमुळे बदललं पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सीरिजचं ठिकाण!

लखनऊ सुपर जायंट्सची टीम : केएल राहुल (कॅप्टन),  क्विंटन डिकॉक, मनिष पांडे, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, रवी बिष्णोई, आवेश खान, दुष्मंता चमीरा, अंकीत राजपूत, शाहबाज नदीम, मनन व्होरा, मोहसीन खान, आयुष बदोनी, कर्ण शर्मा, मयंक यादव, काईल मेयर्स, एव्हिन लुईस

First published:

Tags: Cricket news, Ipl 2022, Kl rahul