मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : अश्निनच्या बायकोनं जिंकलं मन, रडणाऱ्या रितिकाला दिली 'जादूची झप्पी' VIDEO

IPL 2022 : अश्निनच्या बायकोनं जिंकलं मन, रडणाऱ्या रितिकाला दिली 'जादूची झप्पी' VIDEO

रोहित शर्मा आऊट होताच ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) चांगलीच निराश झाली होती

रोहित शर्मा आऊट होताच ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) चांगलीच निराश झाली होती

रोहित शर्मा आऊट होताच ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) चांगलीच निराश झाली होती

मुंबई, 1 मे : रोहित शर्मा (Rohit Sharma) वाढदिवशी मोठी खेळी करेल अशी अपेक्षा असलेल्या जगभरातील फॅन्सची शनिवारी निराशा झाली. राजस्थान रॉयल्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये (MI vs RR) रोहित फक्त 2 रन काढून आऊट झाला. मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. राजस्थानचा अनुभवी ऑफ स्पिनर आर. अश्विनच्या (R. Ashwin) बॉलिंगवर स्विप लगावण्याचा रोहितचा निर्णय फसला. डॅरेल मिचेलनं मागे पळत जात रोहितचा एक सुंदर कॅच घेतला.

रोहित शर्मा आऊट होताच ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली रोहितची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) चांगलीच निराश झाली होती. रितिकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्यावेळी तिच्या बाजूलाच बसलेली अश्विनची बायको प्रिती नारायणला (Prithi Narayan) राहवलं नाही. ती रितिकाच्या जवळ गेली. प्रितीनं रितिकाला मिठी मारत तिला दिलासा दिला. प्रितीनं या कृतीनं सर्वांचंच मन जिंकलं.

अश्विननं मुंबई विरूद्धच्या मॅचमध्ये दमदार खेळ केला. त्यानं 9 बॉलमध्ये 222.22 च्या स्ट्राईक रेटनं 21 रन काढले. त्याचबरोबर 4 ओव्हर्समध्ये 21 रन देत रोहित शर्माची विकेट घेतली. अश्विनच्या या खेळापेक्षाही त्याची बायको प्रितीनं दाखवलेल्या मनाच्या मोठेपणाचीच जास्त चर्चा झाली.

6 मॅच बाहेर बसवलेल्या खेळाडूनंच मुंबईला वाचवलं, रोहितचा वाढदिवस झाला साजरा

मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनं पराभव करत आयपीएल 2022 मधील (IPL 2022) पहिला विजय मिळवला. 159 रनचं आव्हान मुंबईने 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं.  मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक 51 रन केले. तिलक वर्मानं 35 रन केले. सूर्या आणि तिलक एकत्रच आऊट झाल्यानंतर मुंबईचं टेन्शन पुन्हा वाढलं होतं, पण टीम डेव्हिडने राजस्थानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 9 बॉलमध्ये 20 रनवर डेव्हिड नाबाद राहिला.

First published:
top videos

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, R ashwin, Rohit sharma