जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : भरवशाच्या खेळाडूनं दिला पंतला धोका, दिल्लीच्या पराभवात 'ती' चूक निर्णायक

IPL 2022 : भरवशाच्या खेळाडूनं दिला पंतला धोका, दिल्लीच्या पराभवात 'ती' चूक निर्णायक

IPL 2022 : भरवशाच्या खेळाडूनं दिला पंतला धोका, दिल्लीच्या पराभवात 'ती' चूक निर्णायक

DC vs LSG: दिल्लीच्या पराभवानंतर कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) बॅटर्सना दोष दिला. आम्ही कमी रन केल्याची कबुली पंतनं दिली. पण, दिल्लीच्या पराभवात सर्वात भरवशाच्या खेळाडूनं केलेली चूक निर्णायक ठरली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) शेवटच्या ओव्हरममध्ये पराभव केला. 150 रनच्या टार्गेटचं संरक्षण करताना दिल्लीनं शेवटपर्यंत संघर्ष केला. त्यांचे प्रयत्न अखेर अपूर्ण राहिले. लखनऊनं 2 बॉल राखत मॅच जिंकली. दिल्लीचा हा या स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) बॅटर्सना दोष दिला. आम्ही कमी रन केल्याची कबुली पंतनं दिली. पण, दिल्लीच्या पराभवात सर्वात भरवशाच्या खेळाडूनं केलेली चूक निर्णायक ठरली आहे. दिल्ली कॅपिटल्सनं रिटेन केलेला फास्ट बॉलर एनरिच नॉर्खियानं (Anrich Nortje) या मॅचमध्ये मोठी चूक केली. नॉर्खियाला दिल्लीनं मोठा विश्वास दाखवून रिटेन केले होते. कागिसो रबाडा या अनुभवी आणि यशस्वी बॉलरच्या जागी दिल्लीनं नॉर्खियाला रिटेन केले. तो दुखापतीमुळे पहिल्या दोन मॅच खेळला नाही. लखनऊ विरूद्ध तो या सिझनमधील पहिलीच मॅच खेळत होता. या मॅचमध्ये त्यानं कॅप्टन पंतला सपशेल निराश केले. लखनौच्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी नॉर्खियानं धोकादायक बिमर टाकला. त्यानं बिमर टाकण्याचा प्रकार मॅचमध्ये दोन वेळा केल्यानं अंपायरनं त्याची दोन बॉलनंतरच ओव्हर थांबवली. मॅचच्या निर्णायक क्षणी नॉर्खियानं केलेल्या चुकीमुळे पंतही चांगला त्रासलेला दिसला. त्याची उर्वरित ओव्हर पूर्ण कोण करणार हा त्याला प्रश्न पडला होता. अखेर कुलदीप यादवनं पुढील 4 बॉल टाकून ती ओव्हर पूर्ण केली. IPL 2022 : आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूची आई हॉस्पिटलमध्ये,कॅन्सरशीही केला संघर्ष नॉर्खियानं बॉलिंग थांबवेपर्यंत  2.2 ओव्हरमध्ये 35 रन दिले होते. लखनऊच्या खेळाडूंनी त्याच्या बॉलिंगचा सहज सामना करत 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. दिल्लीचा सर्वात अनुभवी फास्ट बॉलर असूनही तो या मॅचमध्ये सर्वाधिक महाग ठरला. त्याची खराब बॉलिंग आणि त्यानं निर्णायक क्षणी केलेली चूक ही दिल्लीच्या पराभवातील निर्णायक गोष्ट ठरली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात