जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : अहमदाबादच्या टीमचं नाव ठरंल, वाचा काय आहे हार्दिकच्या टीमचं नाव

IPL 2022 : अहमदाबादच्या टीमचं नाव ठरंल, वाचा काय आहे हार्दिकच्या टीमचं नाव

IPL 2022 : अहमदाबादच्या टीमचं नाव ठरंल, वाचा काय आहे हार्दिकच्या टीमचं नाव

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2022) 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊची टीम नव्याने मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद टीमनं अखेर त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 फेब्रुवारी :  आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2022) 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊची टीम नव्याने मैदानात उतरणार आहेत. यातल्या लखनऊ टीमचं नाव लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) आहे. तर अहमदाबादनं त्यांच्या टीमच्या नावाची घोषणा केली आहे. ‘गुजरात टायटन्स’ ( Gujarat Titans) असं या टीमचे नाव असेल. अहमदाबादने लिलावाआधी तीन खेळाडूंना टीममध्ये घेतलं आहे, त्यामुळे लिलावावेळी त्यांच्याकडे 52 कोटी रुपये शिल्लक आहेत. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) अहमदाबादने 15 कोटी रुपये दिले आहेत, तर राशिद खानलाही (Rashid Khan) 15 कोटी रुपये देण्यात आले. हार्दिक पांड्या या टीमचा कॅप्टन आहे. भारताचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिलला (Shubman Gill) 8 कोटी रुपये देऊन अहमदाबादने टीममध्ये स्थान दिलं आहे. आशिष नेहराला टीमने मुख्य प्रशिक्षक केलं आहे, तर गॅरी कर्स्टन टीमचे मेंटॉर असतील. IND vs NZ: स्मृती मंधाना T20 मॅच न खेळण्याचं कारण उघड, पहिल्या वन-डे मधूनही बाहेर जगातली सगळ्यात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या 15 व्या मोसमामध्ये 10 टीम सहभागी होतील. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन शहराच्या टीम यंदा पहिल्यांदाच खेळणार आहेत.  10 टीमनं मिळून 33 खेळाडूंना रिटेन केले आहे. आता 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) एकूण 590 खेळाडू लिलावासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी साधारण 200 जणांची निवड होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात