जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: स्मृती मंधाना T20 मॅच न खेळण्याचं कारण उघड, पहिल्या वन-डे मधूनही बाहेर

IND vs NZ: स्मृती मंधाना T20 मॅच न खेळण्याचं कारण उघड, पहिल्या वन-डे मधूनही बाहेर

IND vs NZ: स्मृती मंधाना T20 मॅच न खेळण्याचं कारण उघड, पहिल्या वन-डे मधूनही बाहेर

IND vs NZ: भारत विरूद्ध न्यूझीलंड (India women vs New Zealand Women) यांच्यातील एकमेव टी20 सामन्यांत भारताची धडाकेबाज खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) खेळली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 फेब्रुवारी: भारत विरूद्ध न्यूझीलंड (India women vs New Zealand Women) यांच्यातील एकमेव टी20 सामन्यांत भारताची धडाकेबाज खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) खेळली नाही. स्मृती 2021 साली चांगलीच फॉर्मात होती. या कामगिरीबद्दल आयसीसीनं तिला पुरस्कार जाहीर केला आहे. न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच मॅचमध्ये स्मृती न खेळल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. ती न खेळल्याचं कारण आता उघड झालं आहे. ‘स्मृती मंधानाचा क्वारंटाईन कालावधी अद्याप संपलेला नाही. त्यामुळे ती  हा सामना खेळू शकली नाही. पहिल्या वन-डे सामन्यातही ती खेळण्याची शक्यता नाही.’ अशी माहिती टीम इंडियाची खेळाडू यास्तिका भाटियानं (Yastika Bhatia) दिली आहे. स्मृतीच्या अनुपस्थितीमध्ये यास्तिकानं शफाली वर्मासोबत टीम इंडियाच्या इनिंगची सुरूवात केली. स्मृतीसह फास्ट बॉलर मेघना सिंह आणि रेणुका सिंह या देखील अद्याप क्वारंटाईन आहेत. पण, त्या अजून क्वारंटाईन का आहेत याची माहिती अद्याप समजलेली नाही. स्मृतीच्या अनुपस्थितीचा फटका टीम इंडियाला बसला. न्यूझीलंडनं आज (बुधवार) झालेल्या टी20 सामन्यात भारताचा 18 रननं पराभव केला. न्यूझीलंडनं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हर्समध्ये 155 रन काढले. भारतीय टीमला 156 रनचं आव्हान पेलवलं नाही. निर्धारित 20 ओव्हरमध्ये टीमनं 7 आऊट 138 पर्यंत मजल मारली. IPL 2022: बेन स्टोक्सनं सांगितलं आयपीएलमध्ये न खेळण्याचं कारण, म्हणाला… भारतीय बॅटर्सनी या सामन्यात निराशा केली. एस. मेघना (37) आणि यस्तिका भाटीया (26) यांचा अपवाद वगळता एकाही बॅटरला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. शफाली वर्मा 13 तर कॅप्टन हरमनप्रीत कौर 12 रन काढून आऊट झाली. न्यूझीलंड सीरिजमधील हा एकमेव टी20 सामना होता. आता यानंतर भारतीय महिला टीम 5 वन-डे सामन्याची मालिका खेळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात