मुंबई, 6 मे : दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर मखाया एंटिनी (Makhaya Ntini) याने भेदक बॉलिंगनं एक काळ गाजवला आहे. 101 टेस्टमध्ये 390 विकेट्स घेणारा मखाया आता निवृत्त झालाय, पण त्याचा मुलगा व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे. मखायाचा मुलगा थाडो एंटिनी यानं 2018 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. थाडो सध्या मुंबईतील बोरिवलीमध्ये दिनेश लाड (Dinesh Lad) यांच्याकडून कोचिंग घेत आहे. लाड हे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरचे (Shardul Thakur) कोच आहेत. थाडो सध्या बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेत क्रिकेटचं प्रशिक्षण घेत आहे. तो रेल्वे टीममधील आपल्या शिष्याच्या सांगण्यावरून इथे आला असल्याचं लाड यांनी सांगितलं. माझा विद्यार्थी लींजेड्स टुर्नामेंट दक्षिण आफ्रिकेत टीमचा सहाय्यक होता. त्यानंच माझ्याबाबत मखायाला सांगितलं. दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट सिझन संपल्यानं तो सध्या इकडं आला आहे. आम्ही बुधवारपासून प्रॅक्टीस सुरू केली आहे. थोडो 2 जूनपर्यंत इथं राहील. मी त्याच्याकडून कोणतीही फीस घेतलेली नाही,’ असं लाड यांनी सांगितलं. रोहितला घडवण्यात योगदान रोहित शर्माचे कोच म्हणून दिनेश लाड संपूर्ण क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहेत. लाड यांनी एका क्रिकेट कॅम्पमध्ये रोहितचा खेळ पाहिला होता. त्यांच्या आग्रहामुळेच रोहितनं त्याची शाळा बदलली. रोहित शर्मानं बॉलर म्हणून त्याची कारकिर्द सुरू केली होती. तो सातव्या किंवा आठव्या नंबरवर बॅटींगला येत असे. लाड यांनी रोहितची बॅटींग पाहून त्याला ओपनिंगला पाठवण्याचा निर्णय घेतला. रोहितनं पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त खेळी केली. आज वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक झळकावण्याचा रेकॉर्ड रोहितच्याच नावावर आहे. IPL 2022 : उमरान मलिकनं ‘करून दाखवलं’, दिल्ली विरूद्ध तोडला स्वत:चाच रेकॉर्ड थाडो एंटिनीनं आत्तापर्यंत 14 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 32 च्या सरासरीनं 32 विकेट्स घेतल्या आहेत. 98 रन देऊन 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसंच त्यानं 13 च्या सरासरीनं 194 रन केले आहेत. थाडोनं 14 टी20 मॅचमध्ये 16 आणि 17 लिस्ट ए मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.