मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनीनं केली मित्राची मदत, CSK च्या विजयाचा 'या' टीमला मोठा फायदा

IPL 2022 : धोनीनं केली मित्राची मदत, CSK च्या विजयाचा 'या' टीमला मोठा फायदा

आयपीएल 2022 (IPL 2022)  मधील 55 सामने आता झाले आहेत. हा सिझन शेवटच्या टप्प्यात आल्यानं प्रत्येक सामन्यानंतर 'प्ले ऑफ' (playoff) चं समीकरण बदलत आहे. रविवारी झालेल्या दोन मॅचनंतर ही चुरस आणखी वाढली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 9 मे : आयपीएल 2022 (IPL 2022)  मधील 55 सामने आता झाले आहेत. हा सिझन शेवटच्या टप्प्यात आल्यानं प्रत्येक सामन्यानंतर 'प्ले ऑफ' चं समीकरण बदलत आहे. रविवारी झालेल्या दोन मॅचनंतर ही चुरस आणखी वाढली आहे. रविवारी झालेल्या पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं सनरायझर्स हैदराबादचा (RCB vs SRH) मोठा पराभव केला. या निकालानं आरसीबीची 'टॉप 4' मधील जागा आणखी भक्कम झाली आहे. तर, दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (CSK vs DC) 91 रननं पराभव केला. सीएसकेचा या विजयानं फायदा झालाच आहे, त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) त्याचा जिवलग मित्र फाफ ड्यूप्लेसिस (Faf du Plessis) आरसीबीलाही मदत केली.

सीएसकेनं दिलेल्या 209 रनचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची टीम 117 रनवरच ऑल आऊट झाली. सीएसकेचा या सिझनमधील हा चौथा विजय आहे. या विजयानंतर सीएसके आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) दोघांचेही 8-8 पॉईंट्स झाले आहेत. पण, सीएसकेचा रनरेट चांगला झाल्यानं त्यांनी आता आठवा क्रमांक पटकावला आहे. धोनीची टीम बराच काळ पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर होती.

आरसीबीनं रविवारच्या पहिल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 67 रननं पराभव केला. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करत फाफ ड्यूप्लेसिसच्या 73 रनच्या जोरावर 3 आऊट 192 रन केले. त्यानंतर श्रीलंकन स्पिनर हसरंगाच्या जाळ्यात हैदराबादची टीम अडकली. हसरंगानं 5 विकेट्स घेत हैदराबादला फक्त 125 रनवर ऑल आऊट केले. या विजयानं आरसीबीच्या रन रेटमध्येही सुधारणा झाली आहे.

IPL 2022 : वॉर्नरनं आऊट झाल्यानंतर दिली अंपायरला खुन्नस, पाहा 8 सेकंदांचा थरार ! VIDEO

या मॅचपूर्वी आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये 2 पॉईंट्सचं अंतर होतं. आता आरसीबीचे 14 पॉईंट्स झाले असून हैदराबादचे 10 पॉईंट्सच आहेत. त्यामुळे दोन्ही टीममध्ये आता 4 पॉईंट्सचं अंतर आहे. तर सीएसकेच्या विजयाचाही आरसीबीला फायदा झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सध्या 10 पॉईंट्स आहेत. पण, त्यांचा रन रेट हा आरसीबीपेक्षा चांगला आहे. दिल्लीनं सीएसकेचा पराभव केला असता तर दोन टीममध्ये फक्त 2 पॉईंट्सचे अंतर उरले असते. हे अंतर पार करणे अवघड नाही. कारण, दिल्लीनं आरसीबीपेक्षा एक मॅच कमी खेळली आहे. त्याचबरोबर दिल्लीचा वाढता रनरेट देखील आरसीबीसाठी डोकेदुखी ठरला असता. पण, सीएसकेनं दिल्लीचा पराभव करत आरसीबीची मोठी डोकेदुखी कमी केली आहे.

First published:

Tags: Cricket, Csk, Ipl 2022, MS Dhoni, RCB