Home /News /sport /

IPL 2022 : जेसन रॉयची जागा घेण्यासाठी 3 खेळाडू सज्ज, T20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड

IPL 2022 : जेसन रॉयची जागा घेण्यासाठी 3 खेळाडू सज्ज, T20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड

इंग्लंडचा आक्रमक ओपनर जेसन रॉयनं (Jason Roy) आगामी आयपीएल स्पर्धेतून (IPL 2022) माघार घेतली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या नव्या आयपीएल टीमचा तो सदस्य होता. आगामी सिझनसाठी 3 खेळाडू रॉयला पर्याय ठरू शकतात.

    मुंबई, 3 मार्च : इंग्लंडचा आक्रमक ओपनर जेसन रॉयनं (Jason Roy) आगामी आयपीएल स्पर्धेतून (IPL 2022) माघार घेतली आहे. रॉयनं बायो-बबलचं कारण देत आगामी आयपीएल खेळणार नसल्याचं जाहीर केलं आहे. गुजरात टायटन्स  (Gujarat Titans) या नव्या आयपीएल टीमचा तो सदस्य होता. गुजरातनं रॉयला 2 कोटींच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केले होते. त्याने माघार घेतल्यानं गुजरातला धक्का बसला आहे. जेसन रॉय यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League 2022) 6 मॅचमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीनं 303 रन केले होते. रॉयनं आयपीएलमधून माघार घेतल्यानं आता त्याच्या जागी गुजरात कुणाची निवड करणार याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी सिझनसाठी  3 खेळाडू रॉयला पर्याय ठरू शकतात. ऑस्ट्रेलियाच्या लिमिटेड ओव्हर्स टीमचा कॅप्टन आरोन फिंचला (Aaron Finch) आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये कुणीाही खरेदी केले नव्हते. काही महिन्यांपूर्वी युएईमध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये फिंचच्या कॅप्टनसीमध्ये ऑस्ट्रेलियानं विजेतेपद पटकावले होते. फिंचनं त्याची बेस प्राईज 1.5 कोटी ठेवली होती. गुजरात टायटन्स शुभमन गिलचा जोडीदार म्हणून फिंचला करारबद्ध करू शकते. फिंच टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीमध्ये पाचव्या नंबरवर आहे. त्यानं 88 मॅचमध्ये 2686 रन केले आहेत. त्याचबरोबर त्याला आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तो 2010 पासून आजवर 8 आयपीएल टीमकडून खेळला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान महामुकाबला, विराटचं फॅन्सना खास आवाहन न्यूझीलंडचा अनुभवी ओपनर मार्टीन गप्टीलची (Martin Guptil) आयपीएल मेगा ऑक्शनमधील बेस प्राईज 75 लाख होती. तो देखील फिंचप्रमाणे अनसोल्ड होता. गप्टीलनं मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताविरूद्धच्या टी20 सीरिजमध्ये 2 अर्धशतकांसह 152 रन केले होते. गप्टीलच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये 3, 2999 रन आहेत. तो जेसन रॉयसाठी चांगला पर्याय आहे. इंग्लंडच्या डेव्हिड मलाननं (Dawid Malan) टी20 क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. तो आयसीसी टी20 बॅटर्सच्या रँकिंगमध्ये बराच काळ नंबर 1 होता. त्यानंतरही आयपीएल ऑक्शनमध्ये त्याच्यावर यंदा कुणीही बोली लावली नाही. मलान मागील सिझनमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला होता. तो सध्या आयसीसी टी20 रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मलानही गुजरात टायटन्ससाठी चांगला पर्याय आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Gujrat, Ipl 2022

    पुढील बातम्या