मुंबई, 3 मार्च : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप (Women’s World Cup 2022) स्पर्धेला 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरूवात होत आहे. या स्पर्धेत मिताली राजच्या (Mithali Raj) कॅप्टनसीमध्ये भारतीय क्रिकेट टीम (Team India Women) उतरत आहे. भारताची पहिलीच लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध (India vs Pakistan) होणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला या मॅचची मोठी उत्सुकता आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील याला अपवाद नाही. विराटनं या मॅचपूर्वी फॅन्सना खास आवाहन केलं आहे. विराट सध्या त्याच्या 100 व्या टेस्टची तयारी करत आहे. श्रीलंका विरूद्ध मोहालीमध्ये शुक्रवारपासून ही टेस्ट सुरू होणार आहे. या महत्त्वाच्या टेस्टपूर्वी विराटनं महिला टीमसाठी एक खास ट्विट केलं आहे. ‘वुमन इन ब्लूचा उत्साह वाढवण्याची आणि आपले ब्लू बंधन दाखवण्याची यापेक्षा चांगली वेळ कोणतीही असू शकत नाही. कारण, आता आयसीसी महिला वर्ल्ड कप 2022 चे दिवस आहेत.’ असं ट्विट विराटनं केलं आहे.
No better time to cheer for the #WomenInBlue and show the strength of #HamaraBlueBandhan than this, ‘cause it’s time for the ICC Women’s World Cup 2022!
— Virat Kohli (@imVkohli) March 2, 2022
So set your alarms for 6.30 AM on Mar 6, 2022 & watch #PAKvIND on @StarSportsIndia & Disney+Hotstar | ICC #CWC22 #ad https://t.co/OSAvQTmKAm
8 टीममध्ये होणार स्पर्धा या वर्ल्ड कपमध्ये भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या 8 देशांच्या क्रिकेट टीम सहभागी होणार आहेत. यंदा स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं होईल. त्यामध्ये सर्व टीम एकमेकांच्या विरूद्ध एक मॅच खेळणार आहे. टॉप 4 टीम सेमी फायनलमध्ये दाखल होतील. या स्पर्धेची फायनल 3 एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी 2017 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानं फायनलपर्यंत धडक मारली होती. फायनलमध्ये इंग्लंडनं भारतीय टीमचा पराभव केला होता. IND vs SL : विराट कोहलीची 100 वी टेस्ट पाहण्यासाठी गांगुली येणार का? वाचा मोठं अपडेट आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियानं आजवर सर्वात जास्त 6 वेळा जिंकला आहे. त्यानंतर इंग्लडनं 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर न्यूझीलंडनं एकदा ही स्पर्धा जिंकलीय. कोरोना महामारीचा विचार करत यंदा आयसीसीनं नवा नियम लागू केलाय. यंदा 9 खेळाडूंसह कोणतीही टीम मैदानात उतरू शकते.