मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला? वाचा Inside Story

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव कसा झाला? वाचा Inside Story

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यात बुधवारी आयपीएल 2022 मधील 32 वा सामना झाला. या सामन्यापूर्वी दिल्लीच्या सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यात बुधवारी आयपीएल 2022 मधील 32 वा सामना झाला. या सामन्यापूर्वी दिल्लीच्या सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. सामना सुरू होण्याच्या काही तास आधी टीम सायफर्ट (Tim Siefert) या न्यूझीलंडच्या खेळाडूलाही कोरोनाची लागण झाली. सायफर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह असलेला दिल्लीचा दुसरा खेळाडू आहे, याशिवाय टीमच्या 4 सपोर्ट स्टाफनाही कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या टीममध्ये सगळ्यात आधी फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर फरहार्ट यांच्या संपर्कात आलेला ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्शही (Mitchell Marsh) कोरोना पॉझिटिव्ह आला.

दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व सदस्यांची बुधवारी 4 वेळा कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर पंजाब विरूद्धचा सामना नियोजित वेळापत्रकानुसार पार पडला. दिल्ली टीमचे डॉक्टर अभिजीत साळवी यांनी दिलेलं 'इस्टर डिनर' सध्या चांगलंच चर्चेत आहे. याच डिनरच्या दरम्यान बायो-बबलचं उल्लंघन झाल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे टीम इंडियाचे माजी वैद्यकीय अधिकारी असलेले साळवे अडचणीत आले आहेत.

टीम इंडियानं मागील वर्षी श्रीलंकेचा दौरा केला होता त्यावेळी साळवी डॉक्टर होते. त्या दौऱ्यात 7 भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती,पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. हे सर्व खेळाडू एकमेकांच्या निकटच्या संपर्कात होते. या आयपीएलमध्ये दिल्लीचे फिजियोंना कोरोनाची लागण झाल्यानंतरही विदेशी खेळाडू मोठ्या प्रमाणात इस्टर पार्टीत का सहभागी झाले ? टीमचे डॉक्टर म्हणून साळवी यांनी नियमावली कडक केली होती का? हे प्रश्न आता विचारले जात आहेत.

IPL 2022 : मुंबई विरूद्धच्या मॅचपूर्वी CSK च्या खेळाडूनं सोडलं बायो-बबल, मायदेशी रवाना

वेळापत्रकात बदल

दिल्ली आणि पंजाब (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यात बुधवारी झालेला सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियममध्ये होणार होता, पण कोरोना रुग्ण आढळल्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंना मुंबईच्या हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं, त्यामुळे पुण्याऐवजी ही मॅच मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्यात आली.

दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा सामना 22 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Delhi Capitals vs Rajasthan Royals) पुण्यात होणार आहे, पण ही मॅचदेखील मुंबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांमुळे ही मॅच वानखेडे स्टेडियमवर होईल.

First published:

Tags: Covid-19, Delhi capitals, Ipl 2022