जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ashes सीरिजमधील पराभवाचे पडसाद, इंग्लंड टीममधून 3 दिग्गजांची हकालपट्टी

Ashes सीरिजमधील पराभवाचे पडसाद, इंग्लंड टीममधून 3 दिग्गजांची हकालपट्टी

Ashes सीरिजमधील पराभवाचे पडसाद, इंग्लंड टीममधून 3 दिग्गजांची हकालपट्टी

अ‍ॅशेस सीरिजमध्ये मोठा पराभव झाल्याचे पडसाद इंग्लंड क्रिकेटमध्ये (England Cricket) उमटत आहेत. वेस्ट इंडिज विरूद्धच्या टेस्ट सीरिजसाठी 3 दिग्गजांची टीममधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 फेब्रुवारी : अ‍ॅशेस सीरिजमध्ये मोठा पराभव झाल्याचे पडसाद इंग्लंड क्रिकेटमध्ये (England Cricket) उमटत आहेत. हेड कोच ख्रिस सिल्वरवूड, बॅटींग कोच ग्रॅहम थोर्पे आणि क्रिकेट डायरेक्टर एशले जाईल्स यांची पदावरून यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज विरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी (England vs West Indies) 3 दिग्गजांना टीममधून वगळण्यात आले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे हंगामी डायरेक्टर अ‍ॅण्ड्र्यू स्ट्रॉस यांनी निवड समितीचे प्रमुख जेम्स टेलर, हंगामी कोच पॉल कॉलिंगवूड आणि कॅप्टन जो रूट (Joe Root) यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेसाठी जेम्स अँडरसन (James Anderson), स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आणि जोस बटलर (Jos Buttler) यांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर ओपनर रोरी बर्न्स आणि डेव्हिड मलान यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.  इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा हा निर्णय म्हणजे अनुभवी फास्ट बॉलर अँडरसनच्या करकिर्दीचा शेवट मानला जात आहे. अँडरसनने ऑस्ट्रेलियात चांगली बॉलिंग केली होती. त्याचबरोबर 2023 साली होणाऱ्या अ‍ॅशेस सीरिजमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतरही त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. अँडरसन आणि ब्रॉड यांची एकत्र हकालपट्टी करण्याचा निर्णय धक्कादायक मानला जात आहे. अ‍ॅशेस सीरिजमध्ये  या दोघांनीही चांगली कामगिरी केली होती. अँडरसननं  3 टेस्टमध्ये 8 तर ब्रॉडनं 3 टेस्टमध्ये 13 विकेट्स घेतल्या होत्या. खराब बॅटींगमुळे या सीरिजमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. कॅप्टन रूटनं 32.20 च्या सरासरीनं रन केले. तर मलान आणि स्टोक्सची सरासरी ही 25 पेक्षा कमी होती. बटलरनं 4 टेस्टमध्ये फक्त 15.28 च्या सरासरीनं 107 रन केले होते. टीम इंडियातील अनुभवी खेळाडूचं करिअर समाप्त, श्रीलंका दौऱ्यातून आऊट! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी इंग्लंडची टेस्ट टीम जो रूट, जॉनी बेअरस्टो, जॅक क्रॉली, मॅथ्यू फिशर, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, अ‍ॅलेक्स लीस, साकिब महमूद, क्रेग ओव्हरटन, मॅथ्यू पार्किन्सन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात